पुणे, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुण्यातील वाघोली पोलीस स्टेशन समोरील फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले. या मध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये मुलांच्या काकांसह दोन बालकांचा समावेश आहे.तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्या तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाट्यावर पोलीस ठाण्याच्या समोरच ही घडली. या घटनेतील आरोपी गजानन शंकर तोट्रे हा डंपर चालक दारु पिऊन डंपर चालवित असल्याचे तपासात समोर आले असून त्याला अटक करण्यात आली आहे.