मविआकडून संविधानाचा अवमान
मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मविआच्या नेत्यांना संविधान फक्त निवडणुकीपुरते आठवते.
मविआ सदस्यांनी शपथ घ्यायला नकार दिला, हा संविधानाचा अपमान असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करून मविआच्या नेत्यांवर केली आहे.
मविआकडून संविधानाचा अवमान !
राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान फक्त निवडणुकीपुरते आठवते, हे त्यांनी आपल्या कालच्या कृतीतून सिद्ध केले.
विधानसभेतील नवनिर्वाचित सदस्यांना संविधानाच्या साक्षीने आमदारकीची शपथ घेणे संविधानिकदृष्ट्या आवश्यक असूनही मविआ सदस्यांनी शपथ घ्यायला नकार दिला. हा संविधानाचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आहे. याचा निषेध करावा तेवढे कमीच आहे असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.
ML/ML/PGB
8 Dec 2024