अवकाळी पावसाने मोसंबी उत्पादक अडचणीत…
जालना, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवकाळी रिमझिम पावसाने जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या अवकाळी पावसामुळे आंबिया बहाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने मोसंबी उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. जालना जिल्ह्यात मागील 4/5 दिवसांपासून ढगाळ वातावरण असून मागील 2 दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावलीय.
या पावसामुळे द्राक्षबागांसह मोसंबी बागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच चित्र आहे. जालन्याच्या धारकल्याण, पिरकल्याण यासह परिसरातील गावांमध्ये अवकाळी रिमझिम पावसामुळे मोसंबी बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. परिणामी मोसंबीच्या आंबिया बहाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करीत आहेत.
अवकाळी पावसाने मोसंबी उत्पादक अडचणीत…
ML/ML/PGB
8 Dec 2024