राज्यात 165 पेक्षा जास्त जागा महायुतीला मिळतील
सांगली, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात महायुतीला 165 हून जास्त जागा मिळतील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केला आहे. सांगली विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या प्रचारासाठी तावडे हे सांगलीत आले होते. नंतर विनोद तावडे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जातीनिहाय जनगणनेच्या आड राहुल गांधी यांना मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून द्यायचा डाव आहे, असा आरोप करून विनोद तावडे पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने जनतेला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विकासाचा लाभ मिळवून दिला आहे असा दावाही विनोद तावडे यांनी यावेळी केला.
यावेळी सांगली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर दादा गाडगीळ, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, भाजपाचे नेते शेखर इनामदार यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
ML/ML/SL
11 Nov. 2024