खलिस्तानी दहशतवादी पन्नूची मोठा हल्ला करण्याची धमकी
मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने पुन्हा एकदा धमकी दिली आहे. पन्नूने 1 ते 19 नोव्हेंबरदरम्यान एअर इंडिया विमानाने आंतरराष्ट्रीय प्रवास न करण्याची धमकी दिली आहे. अशा धमक्या मागील काही काळापासून येत आहेत. रविवारी (दि. 20 ऑक्टोबर) देखील या धमक्यांमुळे अनेक विमाने रद्द करण्यात आली आहेत.शीख दंगलीला ४० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे हा हल्ला होऊ शकतो असे पन्नूने म्हटले आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे
PGB/ML/PGB
21 Oct 2024