#बँकेला कर्ज देण्यास कोणतीही अडचण नाही

जम्मू-काश्मीर, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): घगवाल येथे ग्रामीण बँक शाखेच्या वतीने जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाखा व्यवस्थापक सुनील यांनी घगवालमधील लोकांना, युवकांना, शेतकर्‍यांना आणि समाजातील महिलांना विशेष करुन केंद्र सरकारच्या योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. पत व्यवस्थापक अतुल यांनी लोकांच्या प्रश्नांवर चर्चा केली. ग्रामीण भागात, तरुणांना औद्योगिक युनिट स्थापन करण्याबाबत जागरुक केले. काही शेतकर्‍यांनी स्वत:ची दुग्धशाळा आणि कुक्कुटपालन केंद्र सुरू करण्यासाठीही रस दाखवला. बँकेच्या पथकाने सांगितले की बँकेच्या वतीने कर्ज देण्यात कोणतीही अडचण येत नाही. ग्रामीण बँक ग्राहकांना सर्वप्रकारे मदत करते. सगळ्यात शेवटी सामाजिक कार्यकर्ते रामपाल शर्मा यांनी, विविध केंद्र पुरस्कृत योजनांसंदर्भात लोकांमध्ये जागरुकता निर्माण करत असल्याबद्दल बँकेच्या पथकाचे आभार मानले.

Tag-Jammu Kashmir/Rural Bank/Loan
PL/KA/PL/14 JAN 2021