टॅरोच्या अद्भुत सूत्रांचा रहस्यभेद
मुंबई, दि. 10 (सुचिता सावंत) : मागील लेखात आपण tarot चा इतिहास आणि ते भविष्य कथन कुठच्या सूत्रांवर चालते ह्या विषयी जाणून घेतलं , आता आपण त्या प्रत्येक सूत्राविषयी संक्षिप्त मध्ये जाणून घेऊयात,
https://mmcnewsnetwork.com/ero-reding/
“पण त्या आधी tarot हा भविष्य कथनाचा प्रकार म्हणजे एक दैविय संकेताचा प्रकार असून त्या वर पूर्ण विश्वास असण अत्यंत महत्त्वाच आहे हे ही जाणून घेण गरजेच आहे … प्रश्न विचारणारया जातकाच्या प्रश्नासाठी रीडिंग करणाऱ्या रीडरची ऊर्जा अतिशय शुद्ध आणि शांत आणि एकाग्र असण अतिशय महत्वाची आहे”
आता सूत्रांविषयी:
पहिलं सूत्र आहे शकुन शास्त्र
प्राचीन काळापासून शकुन-अपशकुन याबद्दल मान्यता आहे. उदाहरणार्थ, खिडकीवर कावळा बसून ओरडल्यास पाहुणे येणार किंवा काळी मांजर आडवी गेली तर अपशकुन होणार अशी मते रुजली. या मागे अपशकुन पसरवण्याचा उद्देश नाही, तर त्या मागील शास्त्र समजून घेणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, काळ्या रंगाची ऊर्जा गडद असते, ज्यामुळे माणसावर ताण येऊ शकतो. अशा प्रकारे शकुन-
अपशकुनाचा अभ्यास टॅरो पत्त्यांमध्ये केला जातो, जिथे पत्त्यांना ब्रह्मांडाशी जोडले जाते.
दुसर सूत्र अंकशास्त्र”
अंकाचे महत्व ही आपण जाणतो आपण बरेच वेळा म्हणतो हा अंक चांगला नाही हा अंक उत्तम . आपण जन्माला ही एक विशिष्ट तारीख घेऊनच जन्माला येतो. प्रत्येक अंकाची एक ऊर्जा आहे , अगदी सगळे अंक नाही तरी उदाहरणादाखल सांगायचे झाले तर १ हि सूर्याची ऊर्जा घेऊन येतो , २ चंद्र , आणी इतर अंक इतर ग्रहांच्या ऊर्जा घेऊन येतात आणी त्यानुसार भविष्य कथन करताना तो अंक जातकाच्या प्रश्नानुसार त्याच्या भविष्यात काय सांगतोय हे रीडर सांगतो
…त्यानुसार जे भविष्य वर्तवविले जात त्याचा काळ हि सांगता येतो म्हणजे अमुक एक काम ह्या कालावधीत होईल हे ही सांगता येत, त्यातही ५६ मायनर अर्कानाच्या पत्त्यांची चार प्रकारात विभागणी होते आणि त्या त्या विभागानुसार कालावधी कसा ठरतो हे आपण पत्त्यांच्या विस्तृत माहिती मध्ये पुढे जाणून घेऊयात , कुठच्याही गडद रंगाची ऊर्जा प्रखर असते ती प्रत्येक शरीरावर वेगेळे परिणाम करते पण इतक्या खोल शास्त्रात न जाता सरसकट नियम किंवा प्रथा पडत गेल्या म्हणून काळी मांजर अपशकुनी असा प्रघात पडला इतकच , तसच फुलपाखर दिसण हे काहीतरी नवीन स्रुजनर्जनशील घटनांची चाहूल देत अश्या कितीतरी प्रकृतीच्या गोष्टीमधून आपल्याला शकून , अपशुकनाचे संकेत मिळत असतात.
त्याच प्रमाणे tarot पत्त्यामध्ये ह्या शास्त्राचा उपयोग पत्त्यांना ब्रम्हांडाशी जोडून केला जातो म्हणजे पत्त्यांना चार्ज करून , ज्याप्रमाणे आपण मोबाईल चार्ज करतो त्याच प्रमाणे पत्त्त्ताना ब्रम्हांडाशी जोडून चार्ज करण म्हणजे सूर्याच्या किरणांनी किंवा चंद्राच्या किरणांनि त्यांच्या ऊर्जा पत्त्यात्मध्ये आणून त्याला चार्ज केल्याने त्या उर्जांमुळे त्यातून भविष्य कथन करताना दैवी संकेत त्यांच्या आशीर्वादाने मिळतात .
कारण tarot रीडर हा बघून कार्ड काढत नाही रीडर जातकाचा प्रशन मनात घोळवत देवाच नाव घेत पत्ते पिसतो आणी अचानक कुठचीही कार्ड्स काढतो , रीडर फक्त प्रश्न विचारणारा जातक आणी ब्रम्हांड ह्यातील एक दुवा असतो , त्या जातकाला देवी संकेतानेच उत्तरे मिळतात. डेक मधल्या कितीतरी पत्त्यामध्ये फुलपाखरे , फुल , पाने , आकाश आणी त्यातून डोकावणारे देव , काळी , पंढरी मांजर हे ह्या शकून शस्त्राची उदाहरणे म्हणून घेता येईल.
तिसरे सूत्र रंग शास्त्र”
वर नमूद केल्याप्रमाणे काळी मांजर हे उदाहरण आपण रंगाप्रमाणेही पाहून शकतो , तसच लाल रंग हा ही प्रखर ऊर्जेशी जोडला जातो आणी मंगळ ग्रहाशी , लाल रंग शुभ आहे पण क्रोध ह्या ऊर्जेशी ही त्याला जोडलं जात , हिरवा रंग प्रकृतीशी जोडला जातो आणी बुध म्हणजे बुद्धीच्या ग्रहाशी ह्याचा संबंध येतो पांढरा रंग हा सात्विक आणि आध्यात्मिक उन्नतीचा असल्याच मानल जात म्हणून तो पवित्र ,
…..काळा रंग शनीशी आणि म्हणून त्या ग्रहांची वैशिष्ठ त्या अंकाशी जोडली जातात , पण कुठचा रंग व अंक वाईट नसतो त्यातील ऊर्जा आपल्याला किती कमी जास्त प्रमाणात उपयुक्त वा हानिकारक आहे हे समजून उपाय केल्यास प्रत्येक रंग आणी अंक काहीतरी शिकवतोच हे समजण गरजेच आहे. ज्या पत्त्यामध्ये काळा रंग आहे उदाहरणार्थ Five Of Cups हा पत्ता त्यातील पुरुष हा काळा रंगाचा वेश परिधान केलेला आहे तो आणि पाठ करून उभा आहे जणू त्याला सगळ्यापासून दूर जायचं आहे , तो दुखी आहे हे त्यातून कळत , तसच अजून एक पत्ता म्हणजे The Hermit त्यात पंधरा रंगाचा पोशाख घातलेला हातात दिवा पकडलेला एक वयस्क माणूस दिसतो, त्या पत्त्याचा खोल अर्थ अध्यात्मिक उन्नती हा आहे ,
चौथे सूत्र चित्र शास्त्र
प्रत्येक पत्त्यावर काहीतरी चित्र रेखाटली आहेत , त्यानुसार भविष्य कथन होत त्यात रंग , अंक ह्याचा विचार होतोच पण सर्वात जास्त त्या चित्रानुसार तो पत्ता काय सांगतोय हे ठळकपणे कळत , ह्याच एक उदाहरण द्यायच झाल तर , अलीकडे राजकारणात पक्ष फुटी , नेत्यांची घोडेबाजारी वगेरे मोठ्या प्रमाणात सुरु आहे , त्याच प्रमाणे एक मोठा पक्ष ( त्याच नाव नमूद करत नाहीय ) फुटणार कि नाही फुटणार अश्या चर्चा जोर धरत होत्या ,
त्याच वेळी एक taro रीडर , अभ्यासक म्हणून मी हाच प्रश्न घेऊन तीन पत्त्यांचा स्प्रेड केला ( स्प्रेड काय असते हे हि पुढील भागात विस्तृत आपण जाणून घेऊच ) तर त्या स्प्रेड मध्ये त्या पक्षाची ऊर्जा , सद्य परस्थिती आणी महत्त्वाचा प्रश्न पक्षफुटी ? तर स्प्रेडमध्ये जे तीन पत्ते आले त्यातून हे कळलच कि त्या पक्षात खूप उलथापालथ सुरु आहे , आणी शेवटच्या पत्त्याचा उल्लेख मला इथे विशेष करावासा वाटतो तो पत्ता म्हणजे seven of swords हा पत्ता मुख्यत्वे करून धोका देणे , किंवा मिळणे , काहीतरी लपवणे , चोरी होणे वगेरे साठी मानला जातो , तो पत्ता आल्याने हे नक्कीच झाले कि तो पक्ष फुटणार पक्षातील माणसेच धोका देणार आणि काही दिवसातच हि बातमी आली , तर अश्या प्रकारे हे चित्र शास्त्र सूत्र वापरलं जाते.
पाचवे सूत्र अंतर्ज्ञान
अंतर्ज्ञान ही शक्ती सगळ्यांकडे असते पण आपण बाह्य जगात इतके गुरफटून गेलो आहोत कि त्या शक्तीची जाणीव होण्यासाठी आपल्या आत म्हणजे आपल्या अंतर मनाशी जोडायला आपल्याला वेळच नसतो , पण tarot रीडिंग मध्ये ह्याच खूप महत्व आणी ह्या शक्तीची खूप गरज आहे , कारण वरची सूत्र वापरून आपण पत्त्याच निरीक्षण करून भविष्य सांगतोच पण प्रत्येक पत्त्यात एक गूढ लपलेला दैवी संकेत असतोच तोच रीडरला समजण गरजेचे असते आणि तो समजला तर जातकाला त्याच उत्तर देणे सोपे जाते , आणि त्या साठी tarot रीडरने मेडीटेशन , आणी सात चक्रा शुद्ध आणि जागवण गरजेच आहे…..
तरच प्रकृत्तीतून येणारे संदेश आपल्याया सहज मिळू शकतात , हे म्हणजे काचेवरील धूळ पुसल्यावर त्या काचेतून आपल्याला लख्ख स्वच्छ दिसू लागत तसच सात चक्र स्वच्छ केली कि आपल intuition आपल्याला काय संदेश देतेय हे लख्ख दिसत ..आणी मग हे सूत्र कामी येत ….
( लेखिका या शास्त्राच्या अभ्यासक तसेच चित्रपट आणि मालिका लेखिका देखील आहेत)
ML/ML/PGB
10 Oct 2024