सलमान खानच्या वडिलांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने धमकी
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या कुटुंबाला बिश्नोई टोळीने पुन्हा एकदा धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी सलमानचे वडील, ज्येष्ठ पटकथा लेखक व अभिनेते सलीम खान यांना धमकी मिळाली आहे.सलीम खान हे नेहमीप्रमाणे बुधवारी (१८ सप्टेंबर) सकाळी देखील मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. वॉक करून ते घराजवळच्या उद्यानातील एका बाकावर जाऊन बसले होते. त्याचवेळी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाजूने बँडस्टँडच्या दिशेने एक स्कूटर आली. या स्कूटरवर एक इसम व त्याच्या मागे एक बुरखा परिधान केलेली महिला बसली होती. या स्कूटरने यू टर्न घेतला आणि चालक ती स्टूकर घेऊन सलीम खान यांच्याजवळ गेला. त्यानंतर ती महिला सलीम खान यांना म्हणाली, “लॉरेन्स बिश्नोई को भेजूं क्या?” ७४४४ असा त्या स्कूटरचा नंबर होता. पोलीस आता स्कूटरचा शोध घेत आहेत. तसेच स्कूटर चालवणारा इसम व त्याच्या मागे बसलेल्या महिलेचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
TR/ML/PGB
19 Sep 2024