PM मोदींच्या वाढदिवशी ‘या’ महिलांना मिळणार खास गिफ्ट, खात्यात येणार 10,000 रुपये, जाणून घ्या काय आहे योजना?
पंतप्रधान नरेंद्र मोदी ७४ व्या वाढदिवसानिमित्त ओडिशातील महिलांना सुभद्रा योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरवर्षी 10,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. सुभद्रा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना अंगणवाडी केंद्र किंवा ब्लॉक ऑफिस किंवा मो-सेवा केंद्र आणि जनसेवा केंद्रातून फॉर्म मिळवावा लागेल. यासाठी महिलांना वेगळे पैसे द्यावे लागणार नाहीत. पूर्ण केलेला फॉर्म संबंधित कागदपत्रांसह अंगणवाडी केंद्र किंवा ब्लॉक ऑफिसमध्ये जमा करावा लागेल. सुभद्रा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांचे वय 21 ते 60 वर्षे दरम्यान असावे.