उद्या आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाई, मुंबई पोलिसांची उबाठा गटाला नोटीस

 उद्या आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाई, मुंबई पोलिसांची उबाठा गटाला नोटीस

राज्यात महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला केलंय. या बंदला मुंबई हायकोर्टाने बेकायदेशीर ठरवत परवानगी नाकारली आहे. दुसरीकडे सरकारनेही बंद विरोधात पावलं उचलली आहेत. आता मुंबई पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावरून आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *