मेजर सीता शेळके : वायनाड बचाव कार्यातील ‘वाघीण’
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळच्या वायनाडमध्ये 30 जुलैच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसाने होत्याचं नव्हतं करून टाकलं. दरड कोसळून अनेकांची घरदारं, कुटुंब ढिगाऱ्याखाली दबली गेली. बचावकार्यातही अनेक अडचणी येत होत्या. याच अडचणींवर मात करण्यासाठी बांधलेल्या पुलामुळं एका लष्करी अधिकाऱ्यांची सध्या मोठी चर्चा होत आहे. या अधिकारी म्हणजे मराठमोळ्या सीता शेळके.
वायनाडच्या दुर्घटनेनंतरच्या बचावकार्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सीता शेळके या महिला लष्करी अधिकारी आहेत. मूळच्या महाराष्ट्रातील असलेल्या मेजर सीता शेळकेंना सोशल मीडियावर मोठा सन्मान मिळताना दिसत आहे.
चुराल्लमाला ते मुंदाक्काई या दोन गावांना जोडणारा पूल पावसानं वाहून गेला होता. त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाचा लोखंडी पूल लष्करानं सीता शेळके यांच्या नेतृत्वात विक्रमी वेळेत तयार केला.
ML/ML/PGB
3 Aug 2024