Paris Olympic टेबल टेनिसपटू मनिका बत्राची विक्रमी कामगिरी

 Paris Olympic टेबल टेनिसपटू मनिका बत्राची विक्रमी कामगिरी

पॅरिस, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय पॅडलर मनिका बत्राने टेबल टेनिसमध्ये इतिहास रचला आहे. 32 व्या फेरीत मनिका बत्राचा सामना फ्रेंच पॅडलर प्रितिका पावडेशी झाला त्यानंतर मनिकाने 16 च्या फेरीत आपले स्थान निश्चित केले. ऑलिम्पिकमध्ये 16 राउंडमध्ये स्थान मिळवणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय महिला टेबल टेनिस खेळाडू आहे. या विजयातील विशेष बाब म्हणजे जागतिक क्रमवारीत मनिका बत्रा 28 व्या स्थानावर आहे आणि प्रितिका पावडे मानिकापेक्षा दहा स्थानांनी वर आहे.

पहिल्या गेममध्ये मनिका बत्रा दोन गुणांनी पिछाडीवर होती, पण तिने संयम आणि कौशल्याने पुनरागमन करत 11-9 असा विजय मिळवला. दुसऱ्या गेममध्ये भारतीयांनी सुरुवातीपासूनच दडपण आणले आणि पाच गुणांच्या आरामशीर आघाडीसह 11-6 असा विजय मिळवला. तिसऱ्या गेममध्ये प्रितिकाने थोडी झुंज दाखवली, पण मनिकाने ती 11-9 अशी जिंकली. मनिकाने चौथ्या गेममध्ये वर्चस्व कायम राखले आणि 11-7 ने सामना जिंकला.

राउंड ऑफ 64 च्या सामन्यात मनिका बत्राने ग्रेट ब्रिटनच्या ॲना हर्सीचा पराभव केला. या सामन्यात मनिकाने चमकदार कामगिरी करत 11-8, 12-10, 11-9, 9-11, 11-5 अशा गुणांसह विजय मिळवला आणि 32 च्या फेरीत प्रवेश केला.
याआधी, ऑलिम्पिकमध्ये कोणत्याही भारतीय महिला टेबल टेनिसपटूने 32 राउंडच्या पुढे प्रगती केली नव्हती. मनिकानेही हा विक्रम मोडला. शरथ कमलने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत 32 ची फेरी गाठली होती. मनिकाने या पराक्रमामुळे शरथ कमल यांचा विक्रम मोडला.

SL/ML/SL

30 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *