कोकण रेल्वेवरील पंधरा गाड्या रद्द

कोकण रेल्वेवरील पंधरा गाड्या रद्द
सिंधुदुर्ग, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोकण रेल्वे मार्गावर पेडणे येथे अतिवृष्टीमुळे बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल युक्त पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. यामुळे आत्तापर्यंत 15 गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर 15 गाड्या अन्य मार्गे वळवण्यात आलेल्या आहेत. 3 गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत .
मुंबई हून सावंतवाडी पर्यंत मार्गात कोणताही अडथळा नसल्यामुळे या मुंबई ते सावंतवाडी मार्गावरील गाड्या सुरळीत सुरू आहेत. आज संध्याकाळी मडगाव हून सुटणारी कोकणकन्या एक्सप्रेस 20112 मडगाव ऐवजी सावंतवाडीहून मुंबईच्या दिशेने रवाना होईल. Fifteen trains on Konkan Railway have been cancelled
ML/ML/PGB
10 July 2024