राज्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ, मात्र राज्याची सहाव्या क्रमांकावर घसरण

 राज्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ, मात्र राज्याची सहाव्या क्रमांकावर घसरण

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात वर्ष २०२३-२४ साठी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. या अहवालानुसार देशाच्या सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याचा वाटा १३ पूर्णांक ९ दशांश टक्के इतका असून राज्याची अर्थव्यवस्था यावर्षी ७ पूर्णांक ६ दशांश टक्के दराने वाढणं अपेक्षित आहे. हा दर देशाच्या वाढीइतकाच आहे.

राज्यातील कृषी आणि त्या संबंधातील क्षेत्रं यांचा विकासदर १ पूर्णांक ९ दशांश टक्क्यांनी वाढणं अपेक्षित आहे. तर उद्योगक्षेत्रात ७ पूर्णांक ६ दशांश टक्के आणि सेवाक्षेत्रात ८ पूर्णांक ८ दशांश टक्के या दराने वाढ होणं अपेक्षित आहे. राज्याच्या वस्तुनिर्माण क्षेत्रात साडेसात, तर बांधकाम क्षेत्रात ६ पूर्णांक २ दशांश टक्के वाढ अपेक्षित असून उद्योगक्षेत्रात ७ पूर्णांक ६ दशांश टक्के इतकी वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे.

पूर्वानुमानाच्या आधारे राज्याचे दरडोई उत्पन्न २ लाख ७७ हजार ६०३ रुपये इतकं अंदाजित धरण्यात आलं असून गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे. मात्र देशातील अनेक छोटी राज्ये यात महाराष्ट्राच्या पुढे गेली असून राज्याचा क्रमांक यात सहावा झाला आहे. तेलंगण , कर्नाटक , हरियाणा, तामिळनाडू, गुजरात ही राज्ये आपल्या पुढे आहेत. राज्याचे स्थूल उत्पन्न जवळपास २४ लाख ११ हजार कोटी इतके असून गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात ७ पूर्णांक ६ दशांश टक्के इतकी वाढ अपेक्षित आहे.

ML/ML/SL

27 June 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *