पुण्यात ७ दिवसांचा ड्राय डे? चंद्रकांत पाटील यांचा प्रस्ताव
गेल्या आठवड्यात पुण्यात पबमध्ये खुलेआम ड्रग्ज सेवन करणाऱ्या तरुणांचे व्हीडिओ समोर आले होते. त्यामुळे पुण्याची प्रतिमा मलिन होते आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.तेव्हा त्यांनी पुण्यात ७ दिवसांचा ड्राय डे लागू करण्याचा प्रस्ताव दिला गेल्याचे सांगितले. तसेच पाटील यांनी पुण्यातील बार आणि पब संस्कृतीला आळा घालण्यासाठी ठोस उपाय योजना करण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, प्रशासनाने तात्पुरती कारवाई न करता सातत्याने कठोर कारवाई करत राहिले पाहिजे. यादृष्टीने दक्षता पथकात सामान्य नागरिकांना सहभागी करुन घेतले पाहिजे. सगळ्या पुण्याने मिळून तीन किंवा सात दिवस दिवस पब आणि बिअर बार बंद करु, असे ठरवले पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.