ठाणे नाशिक हायवेवर लांबच लांब रांगा, मोठी वाहतूक कोंडी

ठाणे, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाऊस आणि रस्त्यांची कामे यामुळे मुंबई नाशिक हायवेवर भिवंडी , कळवा , खारेगाव टोलनाका इथे मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. खारेगाव टोल नाक्यावर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. दुपारी सुमारे दोन तासापासून अधिक काळ वाहतूक कोंडी झाली होती.
दोन ते तीन किलोमीटर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.यामुळे वाहन चालक हैराण झाले होते. नाशिक हायवेवर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत होता. रस्त्यांची कामे आणि खारेगाव टोल नाका येथे पडलेले खड्डे यामुळे वाहतूक कोंडी झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
ML/ML/SL
20 June 2024