फटाका कारखान्यात भीषण स्फोट ..6 जणांचा जागीच मृत्यू…

 फटाका कारखान्यात भीषण स्फोट ..6 जणांचा जागीच मृत्यू…

नागपूर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरालगत असलेल्या हिंगणा तालुक्यातील धामणा येथे आज दुपारी फटाका बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीर जखमी झाले आहे.. त्यांना उपचारासाठी तातडीने नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडला.

हिंगणा तालुक्यातील धामणा येथे चामुंडा या स्फोटकांची कंपनी कार्यरत आहे. या कंपनीत फटाके दिवे बनवण्याचे काम केले जाते. कारखान्याच्या पॅकेजिंग विभागात दुपारी एकच्या सुमारास आग लागली. तेथे गनपावडर असल्याने मोठा स्फोट झाला आणि हाहाकार माजला.

हा स्फोट झाला तेव्हा तेथे 10 लोक काम करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.हा अपघात इतका भीषण होता की तिथे काम करणाऱ्या सहा जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलीस बचाव पथकासह तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने नागपूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र आग कशी लागली हे अद्याप समोर आलेले नाही.

Terrible explosion in firecracker factory .. 6 people died on the spot…

ML/ML/PGB
13 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *