स्वाईन फ्लूचा कहर; गेल्या २४ तासांत डेंग्यूची रुग्ण संख्या १०० च्या वर

 स्वाईन फ्लूचा कहर; गेल्या २४ तासांत डेंग्यूची रुग्ण संख्या १०० च्या वर

नाशिक, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भर उन्हाळ्यात स्वाईन फ्लूमुळं नाशिककरांची चिंता वाढली असून गेल्या २४ तासांत २ जणांचा बळी गेलाय. शहरात स्वाईन फ्लू बळींची संख्या आठवर पोहोचली आहे. यामुळं प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. नाशिक शहरामध्ये डेंग्यूपाठोपाठ स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वाइन फ्लूमुळं नाशिकमध्ये आणखी दोन जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गेल्या पाच महिन्यात नाशिकमध्ये २८ बाधित असून आतापर्यंत ८ जणांचा स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे. मात्र असं असलं तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं नाशिक महानगरपालिका वैद्यकीय विभागाचं म्हणणं आहे.

२४ तासांत दोघांचा मूत्यू :

मे महिना संपत नाही तोच नाशिक शहरामध्ये डेंग्यूनं डोकं वर काढलं असताना आता स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात स्वाईन फ्लूमुळं नाशिकमध्ये आणखी दोघांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये शहरांमधील ५० वर्षीय पुरुष तर ४२ वर्ष महिलेचा समावेश आहे. गेल्या पाच महिन्यात स्वाइन फ्लूचे २८ बाधित रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत ८ जणांचा बळी घेतला आहे. सर्वसाधारणपणे पावसाळ्यामध्ये उद्भवणारे आजार यंदा उन्हाळ्याच्या कडाक्यामध्येच डोकं वर काढताना दिसून येत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून चालू महिन्यामध्ये तब्बल ३३ डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयामधील बाधितांची संख्या अद्याप समोर आलेली नाही. त्यातच आता स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढल्यानं आरोग्य यंत्रणाची डोकेदुखी वाढली आहे.Swine Flu Devastation; In the last 24 hours, the number of dengue patients is over 100

ML/ML/PGB
1 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *