पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यात लाखो मासे आणि जलचर मृत्युमुखी
कोल्हापूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इचलकरंजी परिसरातून काही दिवसांपासून पंचगंगा नदीपात्रात दुर्गंधीयुक्त रासायनिक सांडपाणी आणि मैलामिश्रित पाणी मिसळत आहे त्यामुळे नदीपात्रात मृत माशांचा खच आणि काळ्याकुट्ट पाण्याला आलेली दुर्गंधी यामुळे परिसरातील मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.
इचलकरंजी इथल्या प्रोसेसचं रसायनयुक्त सांडपाणी पंचगंगा नदीत सोडलं आहे. हे सांडपणी शिरोळ इथल्या पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यात आल्यानं नदी प्रदूषित झाल्यानं लाखो मासे आणि जलचर प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. यामुळे दुर्गंधी पसरली आहे. अशी गंभीर परिस्थिती असताना प्रदूषण नियंत्रण मंडळानं पाहणी आणि नोटिसा देण्यापलीकडे कोणतंच काम केलं नाही.
याचा परिणाम जलचर प्राण्यांवर होत असून, मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडत आहेत. अनेक जलचर प्राणी दगावले आहेत. काठावर मेलेल्या माशांचा ढीग पडला आहे. हे पाणी विषारी बनलं आहे याचा परिणाम जलचर प्राण्यांवर होत असून मोठ्या प्रमाणात मासे मृत्यूमुखी पडत आहेत. तसेच अनेक जलचर प्राणी दगावले आहेत
त्यामुळे हे पाणी पिण्यास अयोग्यच बनले आहे तरीही प्रदूषण महामंडळाने याकडे दुर्लक्ष केले आहे. हे पाणी पिऊन माणसं मेल्यानंतरच प्रदूषण महामंडळ कारवाई करणार का असा संतप्त सवाल जनतेतून व्यक्त होत आहे. शिरोळ ,कुरुंदवाड बंधाऱ्यावर मासे पकडणाऱ्यांची झुंबड उडाली होती काळे कुट्ट, फेसयुक्त दूषित पाणी आल्याने माशांना पाण्यामध्ये ऑक्सिजन मिळत नसल्याने मासे पाण्याबाहेर ऑक्सीजन घेण्यासाठी येत असताना दिसत होते. यावेळी मासेमारी करणारे लोक सहज हाताने मासे गोळा करत होते मिळालेले मासे पोतीच्या पोती भरून बाहेर जात होते.
ML/SL/ML
16 May 2024