विश्वासघात हीच काँग्रेसची ओळख
धाराशिव, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :विश्वासघात ही काँग्रेसची ओळख असल्याचे म्हणत पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकेची तोफ डागली आहे, इंडिया आघाडीत २७२ जागांवर दावा सांगणारा एकही पक्ष नाही, त्यामुळे त्यांच्या मोठमोठ्या बोलण्याला अर्थ नाही.कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून विरोधी आघाडी बनावट व्हिडिओ बनवून लोकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही यावली इंडिया आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उस्मानाबाद येथे झालेल्या प्रचार सभेत केला.
पंतप्रधान मोदी आज महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचार सभेसाठी उस्मानाबाद येथे आले होते यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री डॉ तानाजी सावंत,आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार, आमदार राजाभाऊ राऊत, आमदार ज्ञानराज चौघुले,
आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
देशाला कडधान्य आणि तेलबियांच्या क्षेत्रात स्वावलंबी बनवण्याबाबत बोलताना मोदी म्हणाले की, 2014 पूर्वी काँग्रेसने केवळ 12 हजार कोटी रुपयांच्या डाळी आणि तेलबियांची खरेदी केली होती, तर 2014 नंतर नरेंद्र मोदी सरकारने 1.25 लाख रुपयांच्या डाळी आणि तेलबियांची खरेदी केली असल्याचे सांगून करोडो रुपयांची किमान आधारभूत किंमत दिली असल्याचेही सांगितले.
मराठवाड्यातील २६ सिंचन प्रकल्प काँग्रेसने दीर्घकाळ रखडवले होते, आमच्या सरकारने सत्तेत येताच कामे सुरू केली मराठवाड्यातील पाणीप्रश्नासाठी काँग्रेस सरकार आणि विरोधी आघाडीच जबाबदार असल्याचे मोदी यांनी सांगितले तसेच राज्यातील जलयुक्त शिवारसारख्या योजना बंद करणाऱ्यांना जनतेकडे मत मागण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती जी नंतर उद्धव ठाकरे सरकारने बंद केली. कोरडवाहू भागात पुरेसा पाणीपुरवठा आणि पाणीसाठा हे या योजनेचे उद्दिष्ट होते असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.
ML/ML/PGB 30 APR 2024