स्वस्त शैक्षणिक कर्ज देणाऱ्या 10 प्रमुख बँका

 स्वस्त शैक्षणिक कर्ज देणाऱ्या 10 प्रमुख बँका

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या उच्चशिक्षणासाठी परदेशांत जाण्याचा कल वाढला आहे. तेथील शैक्षणिक शुल्क आणि वास्तव्याचा खर्च यांसाठी शैक्षणिक कर्ज घेणे गरजेचे असते. भारत आणि परदेशातील उच्च शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक वर्ष जून ते ऑगस्ट दरम्यान सुरू होईल. या प्रमुख 10 बँका स्वस्त शैक्षणिक कर्ज देत आहेत. 20 लाख रुपयांच्या 7 वर्षांच्या कर्जावर किती EMI असेल ते जाणून घेऊया.

युनियन बँक ऑफ इंडिया
युनियन बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया 8.1 टक्के दराने शैक्षणिक कर्ज देत आहेत. सात वर्षांच्या कालावधीसाठी 20 लाख रुपयांच्या शैक्षणिक कर्जासाठी ईएमआय 31,272 रुपये असेल.

स्टेट बँक ऑफ इंडिया
स्टेट बँक ऑफ इंडिया 8.15 टक्के दराने शैक्षणिक कर्ज देत आहे. सात वर्षांच्या कालावधीसाठी 20 लाख रुपयांच्या शैक्षणिक कर्जासाठी ईएमआय 31,322 रुपये असेल.

पंजाब नॅशनल बँक
पंजाब नॅशनल बँकेचा कर्ज दर 8.2 टक्के आहे. सात वर्षांच्या कालावधीसाठी 20 लाख रुपयांच्या शैक्षणिक कर्जासाठी ईएमआय 31,372 रुपये असेल.

कॅनरा बँक
कॅनरा बँक 8.6 टक्के दराने शैक्षणिक कर्ज देत आहे. सात वर्षांच्या कालावधीसाठी 20 लाख रुपयांच्या शैक्षणिक कर्जासाठी ईएमआय 31,774 रुपये असेल.

इंडियन बँक
इंडियन बँक 8.8 टक्के दराने शैक्षणिक कर्ज देत आहे. सात वर्षांच्या कालावधीसाठी 20 लाख रुपयांच्या शैक्षणिक कर्जासाठी ईएमआय 31,976 रुपये असेल.

एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँक 9.5 टक्के दराने शैक्षणिक कर्ज देत आहे. सात वर्षांच्या कालावधीसाठी 20 लाख रुपयांच्या शैक्षणिक कर्जासाठी ईएमआय 32,688 रुपये असेल.

आयसीआयसीआय बँक
आयसीआयसीआय बँक 10.25 टक्के दराने शैक्षणिक कर्ज देत आहे. सात वर्षांच्या कालावधीसाठी 20 लाख रुपयांच्या शैक्षणिक कर्जासाठी आयसीआयसीआय 33,461 रुपये असेल.

ॲक्सिस बँक
ॲक्सिस बँक 13.7 टक्के दराने शैक्षणिक कर्ज देत आहे. सात वर्षांच्या कालावधीसाठी 20 लाख रुपयांच्या शैक्षणिक कर्जासाठी ईएमआय 37,149 रुपये असेल.

SL/ML/SL

14 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *