DGCA ने Air India ला ठोठावला 80 लाखांचा दंड

 DGCA ने Air India ला ठोठावला 80 लाखांचा दंड

मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टाटा ग्रुपच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या एअर इंडिया (Air India)ला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA- डायरोक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) ने मोठा दंड ठोठावला आहे. Air India ला तब्बल ८० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यासंदर्भातील DGCA ने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे.फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन्स (FDTL) आणि थकवा व्यवस्थापन प्रणाली (FMS) शी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हा दंड ठोठावण्यात आला आहे.डीजीसीएने उच्च पातळीची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी FDTL आणि FMS नियमांचे पालन करण्यासाठी जानेवारी महिन्यात एअर इंडियाचे स्पॉट ऑडिट केले होते. कंपनीने नियमांचे उल्लंघन करून उड्डाणे चालवत असल्याचे ऑडिट दरम्यान आढळून आले.यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे.

DGCA च्या निवेदनानुसार, अहवाल आणि पुराव्याच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की एअर इंडियाने काही प्रकरणांमध्ये 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दोन्ही फ्लाइट क्रूसह उड्डाणे चालवली आहेत, जे विमान नियम, 1937 च्या नियम 28A च्या उप-नियम (2) चे उल्लंघन करते. क्रूला पुरेशी विश्रांती दिली नाही, प्रशिक्षणाच्या नोंदीही चुकीच्या पद्धतीने चिन्हांकित केल्या आहेत . पुरेशी साप्ताहिक विश्रांती, अल्ट्रा-लाँग रेंज (ULR) फ्लाइटच्या आधी आणि नंतर पुरेशी विश्रांती आणि लेओव्हरवर उड्डाण कर्मचाऱ्यांना पुरेशी विश्रांती प्रदान करणे यांचाही अभाव असल्याचे आढळून आले. याशिवाय चुकीच्या चिन्हांकित प्रशिक्षण नोंदी इत्यादी प्रकरणेही आढळून आली. DGCA ने सांगितले की एअर इंडियाला 1 मार्च 2024 रोजी उत्तर दाखल करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. विमान वाहतूक नियामकाला त्यांचा प्रतिसाद असमाधानकारक वाटला.

जानेवारीमहिन्यातही डीजीसीएने सुरक्षेच्या उल्लंघनासाठी एअर इंडियाला 1.10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. ’12 मिनिट केमिकल पॅसेंजर ऑक्सिजन सिस्टिम’मध्ये कमतरता आढळून आल्यानंतर हा दंड ठोठावण्यात आला आहे.
तक्रारीच्या आधारे, विमान वाहतूक नियामकाने एअर इंडियाच्या विमानांच्या ’12 मिनिट केमिकल पॅसेंजर ऑक्सिजन सिस्टम’ची तपासणी केली. ऑक्सिजन प्रणाली विमानात सुमारे 12-15 मिनिटे ऑक्सिजन तयार करू शकते. आपत्कालीन परिस्थितीत, वैमानिक या वेळेत विमान कमी उंचीवर आणू शकतात, जेथे अतिरिक्त ऑक्सिजनची आवश्यकता नसते.

SL/ML/SL

24 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *