वाशिम जिल्ह्यात पुन्हा अवकाळीचा तडाखा

वाशिम, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज दुपारच्या सुमारास वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा तालुक्यात मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने शेतातील काढणीला आलेला गहु,हरभरा तसेच फळ बागांचे नुकसान झाले आहे.
मंगरूळपीर तालुक्यातील शेलू बाजार आणि वनोजा परीसरात सोसाटयाच्या वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये विद्युत खांब वाकले असून अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली आहेत. वनोजा गावातील घरावरील टिनपत्रे उडून गेल्याने गावकऱ्यांची तारांबळ उडाली, तसेच १७ मार्च रोजी लग्नतिथी असल्याने लग्नाचे मंडप उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे वरातीमध्ये आलेल्या पाहुण्यांची तारांबळ उडाली.
कारंजा तालुक्यातील बिलखेडा परिसरात रस्त्यावर बाभळीचे झाड उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती. आज सकाळपासूनच जिल्हयात ढगाळ वातावरण असून दुपार नंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारठा निर्माण झाल्याने उकाडयापासुन नागरीकांना दिलासा मिळाला आहे. Bad weather again in Washim district
PGB/ML/PGB
17 March 2024