धार्मिक भावना दुखावल्या, ललित कला केंद्र संचालक अटकेत

पुणे, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे येथील ललित कला केंद्रात सध्या दिल्लीतील JNU सारखे वारे वाहू लागल्याचे चित्र दिसत आहे. कला सादरीकरणाच्या नावाखाली लोकभावनेला तडा जाईल अशा रितिने पौराणिक व्यक्तिरेखांचे विकृत सादरीकरण झाल्याची घटना समोर आली आहे. ही बाब अभाविपने समोर आणल्यानंतर ललित कला केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे आणि अन्य सहाजणांना अटक करण्यात आली. आरोपींनी न्यायालयात जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. या प्रकरणी ललित केंद्राचे प्रा. प्रवीण भोळे आणि विदयार्थ्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सायंकाळी रामायणातील व्यक्तिरेखा असलेल्या नाटक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले. नाटकातील संवादातून भावना दुखावल्या प्रकरणी ललित कला केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांचे रामायणातील व्यक्तिरेखा असलेले नाटक शुक्रवारी सायंकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी बंद पाडले. पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद असल्याचा, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला. याबाबत अभाविपंकडून तक्रार देण्यात आली.
ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी रामायणातील व्यक्तिरेखांवर नाटक सादर केले. या नाटकात भावना दुखावणारे संवाद होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून विभाग प्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना अटक केली आहे, अशी माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. भोळे विभाग प्रमुख आहेत. नाटक सादर करण्यापूर्वी किमान त्यांनी संहिता वाचायला हवी होती. भावना दुखावून समाजात तेढ निर्माण करणे हा दखलपात्र गुन्हा असल्याचे मगर यांनी स्पष्ट केले.
SL/KA/SL
3 Feb. 2024