निवडणुकीच्या तोंडावर मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धर्मवीर आनंद दिघे अर्थसहाय्य योजने अंतर्गत मुंबईतील १० वर्षांवरील ८० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगांना सहा महिन्याला १८ हजार तर ४० ते ८० टक्के दिव्यागांना सहा महिन्यांत ६ हजार रुपये अर्थसहाय्य, महिलांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षा अभियान, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शहरी हरितकरण प्रकल्प, झिरो प्रिस्क्रीप्शन या नवीन चार योजना शुक्रवारी जाहीर करण्यात आल्या. या नवीन योजनांची अंमलबजावणी येत्या १ एप्रिलपासून होणार आहे. मुंबई महापालिकेचा सन २०२४ – २५ चा ५९,९५४ .७५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर करण्यात आला. दरम्यान, आगामी लोकसभा विधानसभा व मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मालमत्ता कर वाढ लागू न करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे सन २०२४ – २५ च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांची छाप दिसून आली. दरम्यान, प्रकल्पांसाठी अंतर्गत निधीमधून तब्बल ४७९४.४८ कोटी उचलणार असून पाणीपट्टी, मलनिस्सारण कर वाढीचे संकेत अर्थसंकल्पातून मिळत आहे.
पालिकेच्या शिक्षण विभागाचा सन २०२४ – २५ या आर्थिक वर्षासाठी ३४९७.८२ कोटींचा व १५०.६९ वाढीचा अर्थसंकल्प पालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी शुक्रवारी पालिका आयुक्त व प्रशासक इकबाल चहल यांना पालिका सभागृहात सादर केला. तर पालिकेचा मुख्य अर्थसंकल्प पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी प्रशासक डॉ इकबाल सिंग चहल यांना सादर केला. या अर्थसंकल्प सादर करण्याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे, अश्विनी जोशी, विजय सिंघल, पालिका चिटणीस संगीता शर्मा उपस्थित होते.
मुंबई महापालिकेकडून मुंबईत उभारण्यात येणारे नवीन प्रकल्प, योजना यासाठी हजारो कोटींच्या निधीची आवश्यकता भासणार आहे. तसेच, त्यामुळे पालिकेने मुंबई बाहेरून मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकडून “स्वतंत्र शुल्क” आकारणी करण्याचे प्रस्तावित केले असून विचाराधीन आहे. मालमत्ता कर वसुली ६ हजार कोटी रुपये अपेक्षित असताना त्यामध्ये तब्बल १५०० कोटींची घट येणार आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात महसुली उत्पन्न ३३,२९०.०३ कोटी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३२,८९७.६८ कोटी रुपये एवढे जमा होणार असल्याने महसुली उत्पन्नात ३९२.३५ कोटी रुपये घट येणार आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात औषधोपचार घेण्यासाठी येणाऱ्या मुंबई बाहेरील रुग्णांकडून “स्वतंत्र शुल्क” आकारणी वसूल करण्याचा पालिकेचा मानस आहे. तसेच, मलजल प्रक्रिया केंद्र प्रकल्प उभारणीवर कोट्यवधी रुपयांचा खर्च भागविण्यासाठी मलनि:सारण आकारणीमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यासाठी पुनरावलोकन करण्यात येणार आहे. बांधीव क्षेत्रावर आकारले जाणारे अतिरिक्त मलनि:सारण अकार व जल आकार यामध्ये सुधारणा करण्यासाठी आर्थिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. कोस्टल रोड, गोरेगाव – मुलुंड लिंक रोड, मलजल प्रक्रिया प्रकल्प राबविल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र त्यावरील भांडवली खर्चात गेल्यावर्षीच्या तुलनेत सुमारे ६ हजार कोटी वाढ होणार आहे.
भांडवली खर्च पाहता सदर प्रकल्प दीर्घकाळ कार्यान्वित ठेवण्याच्या दृष्टीने आर्थिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागार नेमून सदर प्रकल्प स्वयंपूर्ण बनविण्याच्या शक्यतेची चाचपणी करण्यात येणार आहे. म्हणजेच भविष्यात त्यातून उत्पन्नाच्या वाटा शोधल्या जाणार आहेत. त्याचा फटका नागरिकांना कर रूपाने बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना एकीकडे नवीन योजना, प्रकल्प, विकासकामे बहाल करण्यात येणार असे आश्वस्त करताना दुसरीकडे मुंबईकरांच्या खिशाला कर व दर वाढीची कात्री लावण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.
आगामी निवडणुका लक्षात घेता, गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात ७ हजार ३३५ कोटी ६८ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. “मुख्यमंत्री शून्य प्रिस्क्रिप्शन धोरण” राबविण्यात येणार असून त्याद्वारे रुग्णांना बाहेरील मेडिकल ऐवजी रुग्णालयातच औषधे देण्यात येणार आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण राखण्यासाठी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शहरी हरितिकरण प्रकल्प” पूर्व द्रुतगती मार्गावर आणि इतरत्र ५ लाख बांबू वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच, दिव्यांग लोकांना सहामाही किमान ६ ते १८ हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यासाठी “धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना” अशा काही नवीन योजना राबविण्यात येणार आहेत. तसेच, पालिकेने हाती घेतलेल्या कोस्टल रोड, काही विविध योजना, विकासकामे, प्रकल्प आणि सोयीसुविधा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देण्यासाठी हजारो कोटींच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. तसेच खड्डे मुक्त रस्ते, प्रदूषण मुक्त, स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबई शहर बनविण्यासाठी सुशोभीकरण, ५ लाख बांबू वृक्षारोपण, सीसी रोड, पुलांची कामे, कोस्टल रोड प्रकल्प आदी विकासकामांना उभारी देण्याचे सूतोवाच आयुक्त चहल यांनी या अर्थसंकल्पात केले आहे. चालू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण होतील, नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
तसेच खड्डे मुक्त रस्ते, प्रदूषण मुक्त, स्वच्छ, सुंदर आणि हरित मुंबई शहर बनविण्यासाठी सुशोभीकरण, ५ लाख बांबू वृक्षारोपण, सीसी रोड, पुलांची कामे, कोस्टल रोड प्रकल्प आदी विकासकामे यांना चालना देण्याचे सूतोवाच आयुक्त चहल यांनी या अर्थसंकल्पात केले आहे.
कोरोना काळात २०२१-२२ व २०२२-२३ या काळात कोरोना महामारीमुळे मालमत्ता कर न वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आगामी पालिका निवडणुकीमुळे करवाढीबाबत चालढकल केली जात आहे. मात्र निवडणुकीनंतर मालमत्ता करवाढ करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. महसूली उत्पन्नात वाढ करण्यासाठी मालमत्ता कर थकबाकीदारांकडून प्रभावी वसूली करण्यात येणार असल्याचे स्पष्ट दिसते आहे. मालमत्तांचे मूल्यांकन आणि प्रत्यक्ष ई लिलाव या कामासाठी एजन्सी नेमण्याची प्रक्रीया सुरू असून लिलाव प्रक्रिया सुरू झाल्यास कर भरण्याचे प्रमाण वाढेल अशी माहितीही चहल यांनी दिली.
कोस्टल रोड, गोरेगाव मुलुंड जोडरस्ता प्रकल्प, मलनिसारण प्रकल्प, पाणी पुरवठा आणि मलनिसारण बोगदे, मिठी नदी प्रकल्प, नद्यांचे पूनरूज्जीवन, आश्रय योजना, रुग्णालयांचा विकास आदी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार असून नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठीच्या या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेकडून मुंबईत उभारण्यात येणारे नवीन प्रकल्प, योजना यासाठी हजारो कोटींच्या निधीची आवश्यकता भासणार आहे. तसेच, त्यामुळे पालिकेने मुंबई बाहेरून मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकडून “स्वतंत्र शुल्क” आकारणी करण्याचे प्रस्तावित केले असून त्यावर विचारमंथन सुरू झाले आहेत. तसेच, मालमत्ता कर वसुली ६ हजार कोटी रुपये अपेक्षित असताना त्यामध्ये तब्बल १५०० कोटींची घट येणार आहे.
……..
- मुंबई महापालिकेचा ५९९५४.७५ कोटीचा अर्थसंकल्प
- आरोग्यासाठी – ७,१९१. १३ कोटी तरतूद
शिक्षणासाठी – ३४९७.८२ कोटी तरतूद
बेस्टसाठी – ९२८.६५ कोटी तरतूद
…..
ठळक तरतुदी – - कोस्टल रोड कामांसाठी – २९०० कोटी
- कोस्टल रोड – वर्सोवा ते दहिसर -: १,१३० कोटी
- कोस्टल रोड – लिंक रोड ते दहिसर ते मिरा – भाईंदर – २२० कोटी
- रस्ते व वाहतूक – ३२०० कोटी
- गोरेगाव – मुलुंड लिंक रोड – १,८७० कोटी
- मुंबई मलनि:सारण प्रकल्प -: ५,०४५ कोटी
- पाणी पुरवठा प्रकल्प -: २,४०० कोटी
- जल अभियंता -: १,०२० कोटी
- मलनि:सारण प्रकल्प -: ७६५ कोटी
- रेल्वे पूल विभाग दुरुस्ती, पुनर्बांधणी १,६१० कोटी
- पर्जन्य जलवाहिन्या -: १,९३० कोटी
- नद्यांचे पुनरुज्जीवन ३५७ कोटी
- प्राथमिक शिक्षण ३,४९७.८२ कोटी
- घनकचरा व्यवस्थापन -: ३९८ कोटी
- आश्रय योजना -: १,०५५ कोटी
- नगर अभियंता -: ७७८.२६ कोटी
- सामाजिक प्रभाव (नियोजन) -: ५०७.९८ कोटी
- इमारत परिरक्षण विभाग -: ३५५.९२ कोटी
- मुंबई अग्निशमन दल -: २३२ कोटी
- यांत्रिकी व विद्युत विभाग -: २१२.४९ कोटी
- उद्यान विभाग -: १७८ कोटी
- बाजार विभाग -: १०५ कोटी
- राणीची बाग -: ७४.३० कोटी
- पशुवैद्यकीय आरोग्य खाते व देवनार पशुवधगृह -: २७ कोटी
- बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदत – ९२८ कोटी
- – मुख्यमंत्री शून्य प्रिस्क्रिप्शन धोरण – ५०० कोटी
…………
आरोग्यासाठी तरतूद – - आरोग्य सुविधांवरील अंदाजित खर्च – ७,१९१. १३ कोटी रुपये इतका आहे.
- भगवती रुग्णालयाचा कायापालट – ११० कोटी रुपये
- पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय गोवंडी – ९२.८४ कोटी
- सायन रुग्णालय -: ( टप्पा -१) ८५ कोटी
- शताब्दी रुग्णालय, कांदिवली ६९ कोटी
- अगरवाल रुग्णालय, मुलुंड – ६४.५४ कोटी
- संघर्ष नगर रुग्णालय, कुर्ला – ५५ कोटी
- भाभा रुग्णालय, वांद्रे विस्तारीकरण – ५०.४५ कोटी
- भांडूप येथे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय – ४५ कोटी रुपये
- नायर रुग्णालय – ३६.७० कोटी
- सिद्धार्थ रुग्णालय पुनर्विकास – ३६.६८ कोटी
- ओशिवरा प्रसुतीगृह – ३३ कोटी
- एक्वार्थ रुग्णालय ३२ कोटी
- नेत्र रुग्णालय पुनर्विकास – २७ कोटी – हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – आपला दवाखाना महसुली तरतूद – ७५.९६ कोटी रुपये आणि भांडवली तरतूद – २३.४६ कोटी – असंसर्गजन्य रोग कक्ष – १२ कोटी
- सायन कोळीवाडा वसतिगृह १८ कोटी रुपये
……. - या कामांना प्राधान्य –
- मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन
- जकात नाक्यांच्या वाहतूक आणि व्यावसाय़िक केंद्र
- रस्त्यांचे पुनर्पृष्टीकरण
- दुभाजकांचे सुशोभिकरण
- पदपथांची सुधारणा आणि सुशोभिकरण
-स्कायवॉक विद्युतीकरण - वाहतूक बेटांचे सुशोभिकरण
- समुद्र किनारे व उद्यानांचे सुशोभिकरण व विद्युतीकरण
- मियावाकी वृक्षारोपण
- सुविधा शौचालये
- वायू प्रदूषण कमी केले जाणार
- संपूर्ण स्वच्छता मोहिम
- मुख्यमंत्री शून्य प्रिस्क्रिप्शन धोरण
- मलनीसारण आकार व जल आकारामध्ये सुधारणा करणे
- बाहेरून येणा-या रुग्णांसाठी स्वतंत्र शुल्क रचना करणे
- मुंबईला स्वच्छ व हरित आणि प्रगतशील करण्यासाठी नागरि सुविधांचे सक्षमीकरण
- कोस्टल रोड
- गोरेगाव- मुलुंड जोडरस्ता प्रकल्प
- मलनीसारण प्रक्रिया प्रकल्प
- रस्त्यांचे काँक्रिटीकरण
- पाणी पुरवठा व मलनीसारण बोगदे, मिठी नदी प्रकल्प, नद्यांचे पुनरुज्जीवन
- आश्रय योजना
- रुग्णालयांची विकास कामे
……..
नियोजित प्रकल्प –
पार्किंग अॅप –
वाहनतळातील जागांचे आगाऊ बुकींग व त्याचे ऑनलाईन पेमेंट करण्याकरीता पालिकेने पार्किंग अॅप तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
……..
माय बीएमसी बिल्डिंग आयडी –
पालिकेच्या कर्मचा-यांसह नागरिकांना इमारतींशी संबंधित माहिती एका क्लिकवर उपलब्ध करण्यासाठी सद्यस्थितीत सुरु असलेल्या उपक्रमात विविध विभागांची अतिरिक्त माहिती एकत्रित केले जाणार आहे.
………
इंटरनेट ऑफ थिंग्ज –
माहितीचे संकलन आणि विश्लेषण करण्यासाठी स्मार्ट बीन, मॅनहोल मॉनिटरिंग, स्मार्ट, दिवे व जलमाफके आदी स्मार्ट नागरि सुविधांसाठी चाचपणी केली जाते आहे.
……….
मनोरंजन सुविधांसाठी ऑनलाईन आरक्षण प्रणाली –
पालिकेची नाट्यगृहे, प्राणी संग्रहालये, क्रीडा संकुले, खेळाची मैदाने यांच्या ऑनलाईन आरक्षणासाठी स्वतंत्र हेल्पलाईनसह संगणीकृत प्रणाली लवकरच सुरु केली जाणार आहे.
………
कोस्टल रोड –
कोस्टल रोडचा एक भाग फेब्रुवारी २०२४ पासून सेवेत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच माईंडस्पेस मालाड जंक्शन पासून जीएमएलआरच्या गोरेगाव पूर्व येथील आऱंभ बिंदूपर्यंत उन्नत जोडरस्त्यासह कोस्टलरोड प्रकल्पाच्या वर्सोवा आंतर बदल ते दहिसर आंतरबदल असे संरेखन असलेला महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे मुंबई दक्षिण टोक व पश्चिम उपनगरे, मुलुंड व ठाण्याशी जोडली जातील.
रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण –
सन २०२४ -२५ मध्ये सुमारे २०९ किमी रस्त्यांची सुधारणा सिमेंट काँक्रिटीकरणमध्ये करण्याचे प्रस्तावित आहे. त्याबाबतची निविदा प्रक्रिया सुरु आहे.
……
पश्चिम द्रूतगती मार्गाचे नुतनीकरण-
पश्चिम द्रूतगती महामार्ग व पूर्व द्रूतगती महामार्ग एमएमआरडीएने नोव्हेंबर २२ मध्ये पालिकेकडे सुपूर्द करण्यात आले असून सुकर प्रवासासाठी दोन्ही महामार्गांची देखरेख ठेवली जात आहे. दोन्ही महामार्गावरील प्रवेश नियंत्रण प्रकल्पांतर्गत पूर्वद्रूतगती मार्गावर १ संगमस्थान आणि पश्चिम द्रूतगती मार्गावर ३ संगमस्थानांची सुधारणा प्रस्तावित आहे.
….
मीठी नदी –
सद्यस्थितीत मीठी नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणाचे ९५ टक्के कााम आणि संरक्षण भिंत बांधण्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. मीठी नदीच्या विकास व प्रदूषण नियंत्रणाच्या आराखड्याची अंमलबजावणी ४ पॅकेजमध्ये प्रस्तावित आहे.
……
नद्यांचे पुनरुज्जीवन –
दहिसर, पोईसर, ओशिवरा व वालभट्ट नद्यांच्या पुनरुज्जीवन कामांकरीता कार्यादेश देण्यात आले आहेत. सदर कामे प्रगतीपथावर असून यासाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे.
Rain of announcements in the budget of Mumbai Municipal Corporation ahead of elections
ML/KA/PGB
2 Feb 2024