मकर संक्रांती निमित्त रुक्मिणी मातेस अभिषेक

 मकर संक्रांती निमित्त रुक्मिणी मातेस अभिषेक

सोलापूर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज पंढरपूरच्या मंदिरात महिलांनी पहाटेच रुक्मिणी मातेची भोगी पूजा केली यावेळी रुक्मिणी मातेस परंपरेप्रमाणे विधीवत अभिषेक करण्यात आला. या अभिषेकासाठी सर्वसामान्य महिला भक्तांना सहभागी होता आले होते. यानंतर महिलांनी रुक्मिणीमातेस सौभाग्याचे लेणे असणाऱ्या गोष्टी अर्पण केल्या. तसेच एकमेकांना वानवसा देऊन रुक्मिणी मातेच्या साक्षीने भोगीच्या परंपरा संपन्न केल्या. यावेळी रुक्मिणी मातेस सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले होते. Rukmini Mates Abhishek on the occasion of Makar Sankranti

https://youtu.be/qpUeWcwzmOM

ML/KA/PGB
14 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *