शेणखताच्या खड्ड्यात पडल्याने ८० शेळ्या मेंढ्या मृत्युमुखी
वर्धा, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रात्रीच्या अंधारात मेंढपाळाच्या मागे चालत असलेल्या शेळ्या मेंढ्यांच्या कळपातील ८० शेळ्या आणि मेंढ्या अचानक शेण खताच्या खोल खड्ड्यात पडल्याने चेंगराचेंगरीत ठार झाल्या. यातील काहींना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले आहे. यात मेंढपाळाचे ११ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
गिरोली येथील प्रभाकर रामजी थुल यांच्या शेतात ७०० शेळ्या मेंढ्यांचा कळप चाऱ्या करिता थांबला होता. शेत मालकासोबत झालेल्या करारानुसार काही दिवसांसाठी हा कळप त्यांच्या शेतातच मुक्कामी होता. दरम्यान पहिल्याच दिवशी सायंकाळी हा कळप परिसरातील शेत शिवारातून फेरफटका मारून थूल यांच्या शेताकडे जात होता.
यावेळी रात्रीच्या अंधाराचा अंदाज न आल्याने कळपातील काही शेळ्या मेंढ्या थूल यांच्या शेतालगतच्या शेणखताच्या खोल खड्ड्यात पडल्या. यामुळे चेंगराचेंगरीत ८० शेळ्या, मेंढ्या ठार झाल्या. तर काहींना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात यश आले.
ML/KA/SL
3 Jan. 2024