प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी १ हजार किमीचा प्रवास सायकलने…

 प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी १ हजार किमीचा प्रवास सायकलने…

वाशिम, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तब्बल ४ हजार किलोमीटर अंतर सायकलने प्रवास करून आरोग्यविषयक जनजागृती करुन आदर्श उपक्रम राबविणारे वाशिम जिल्ह्यातील पार्डी ताड येथील योग शिक्षक राजू डांगे २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी १ जानेवारी रोजी रवाना झाला आहेत.

यापूर्वी राजू डांगे यांनी हरिद्वार, अयोध्या असे देशभ्रमण करुन चार हजार किलोमीटर अंतराचा प्रवास ५५ दिवसांत पूर्ण करून
आरोग्यविषयक जनजागृती केली होती.

अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा २२ जानेवारीला होणार आहे. या सोहळ्यात तो सहभागी होणार आहे. हा १ हजार ४१ किलो मीटरचा प्रवास सायकलने पूर्ण करीत योग शिक्षक राजु डांगे अयोध्या नगरी गाठणार असून प्रवासादरम्यान निरोगी आरोग्याचा संदेशही देणार आहेत.

ML/KA/SL

1 Jan. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *