ChatGPTला टक्कर देणारे गुगलचे Gemini AI Model

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुगलने आपले नवीन (AI) मॉडेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल जेमिनी (Gemini AI) सादर केले आहे. हे मॉडेल गुगलची मूळ कंपनी Alphabet ने विकसीत केले असून याबाबतची घोषणा गुगलने केली आहे. Gemini हे नवे (AI) मॉडेल OpenAI च्या GPT-4 आणि Meta च्या Llama 2 शी थेट स्पर्धा करेल.Gemini AI एकाच वेळी अनेक कामे करण्यासाठी बनवण्यात आले आहे. टेक्स्ट, इमेज, कोड आणि व्हिडीओ अशा एकाच वेळी विविध प्रकारच्या माहितीवर काम करु शकते. गुगलने हे एआय मॉडेल जेमिनी अल्ट्रा, प्रो, नॅनो या तीन प्रकारांमध्ये सादर केले आहे.
गुगलचे हे (AI) मॉडेल सर्वात शक्तिशाली असल्याचा दावा गुगलकडून करण्यात आला आहे. हे मॉडेल एका खास पद्धतीने विकसित करण्यात आले असून तीन व्हेरिएंटमध्ये हे मॉडेल उपलब्ध असेल.
गुगलचे जेमिनी हे मॉडेल गुगलची मूळ कंपनी Alphabet ने विकसीत केले असून याबाबतची घोषणा गुगलने केली आहे. Gemini हे नवे (AI) मॉडेल OpenAI च्या GPT-4 आणि Meta च्या Llama 2 शी थेट स्पर्धा करेल.
जेमिनी मॉडेल 170 हून अधिक देशांमध्ये वापरता येणार असून सध्या ते इंग्रजी भाषेतच यूजर्ससाठी उपलब्ध आहे. जेमिनी मॉडेल मॅसिव्ह मल्टीटास्क लँग्वेज अंडरस्टँडिंग मॉडेलवर आधारित असून Google च्या DeepMind विभागाद्वारे तयार करण्यात आला आहे.
दरम्यान McDonald’s ने Google सह Gemini AI चा वापर करण्याबाबत करार करणार आहे. 2024 या वर्षी हा करार होणार असूनजगातील आउटलेट्समध्ये Generative AI ची सुरवात करणार आहे. या Generative AI सोबतच कंपनीचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरही अपग्रेड होतील.
या AI सिस्टिममुळे आमच्या क्रु आणि ग्राहकाला चांगला अनुभव मिळेल असे मॅकडोनाल्डचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि जागतिक मुख्य माहिती अधिकारी ब्रायन राईस म्हणाले.
SL/KA/SL
7 Dec. 2023