कारागृहातील बंदीवानांनीही अनुभवली दिवाळी पहाट

 कारागृहातील बंदीवानांनीही अनुभवली दिवाळी पहाट

कल्याण, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळीचा सण सगळीकडे उत्साहात साजरा होत असतानाच, सर्वसामान्यां
प्रमाणे कल्याण कारागृहातील बंदीवानांनीही सण साजरा करण्यासाठी दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते. अपर पोलीस महासंचालक तथा तथा कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून दिवाळी सणाचे औचित्य साधून सेवाधाम या सेवाभावी संस्थेच्या वतीने दिवाळी पहाट, या संगितमय कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. Jail inmates also experienced the dawn of Diwali

कारागृहातील महिला आणि पुरूष बंदी, या कारागृहात दाखल असून ते समाजापासून तसेच कुटुंबापासून वंचित असल्याची खंत त्यांचे मनामध्ये राहू नये आणि बंद्यांमध्ये सुधारणा व्हावी तसेच त्यांना गुन्हेगारी पासून परावृत्त करुन त्यांचे पुनर्वसन करण्याचे उद्देशाने कारागृह प्रशासनामार्फत विविध सुधार कार्यक्रमा
अंतर्गत उपक्रम राबविण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून दिवाळी पहाट या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .

त्यामध्ये मराठी , हिंदी भक्तीगीते, भावगीते, देशभक्तीपर गीते सादर करण्यात आले.सदर प्रसंगी कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अष्टूरकर हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. कारागृहातील सर्व महिला , पुरूष बंदयांनी मोठया उत्साहाने या कार्यक्रमाचा आनंद घेतला.

ML/KA/PGB
16 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *