मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पंडित नेहरू यांना अभिवादन

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताचे पहिले भारतरत्न पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना जयंती निमित्त आज येथे विनम्र अभिवादन केले. तसेच पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या बालदिनाच्याही बालदोस्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांनी जयंती निमित्त वर्षा शासकीय निवासस्थानी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थित आमदार दिलीपमामा लांडे, तसेच माजी आमदार रवींद्र फाटक, विजय शिवतारे, डॉ. दीपक सावंत, अभिजीत अडसूळ आदींनीही पंडित नेहरू यांना अभिवादन केले.
ML/KA/SL
14 Nov. 2023