सात हजार मोसंबी फळाची विठ्ठल मंदिरात आरास
सोलापूर दि १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणाऱ्या दिवाळी पाडव्यानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोसंबी फळापासून आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तब्बल सात हजार मोसंबी फळाचा वापर करून संपूर्ण विठ्ठल मंदिर हे सजवण्यात आले आहे.
पैठण येथील आप्पासाहेब पाटील या भाविकांने विठ्ठल चरणी ही आरास अर्पण केली. एरवी पानाफुलात सजणारा विठुराया आज मोसंबी फळात सजल्याने अधिक मनमोहक आणि लोभस दिसत आहे. दिवाळी पाडव्यानिमित्त पहाटेपासूनच विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.
ML/KA/SL
14 Nov. 2023