या सरकारी कंपनीकडून लाभांश जाहीर
नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया Power Grid Corporation of India या सार्वजनीक क्षेत्रातील कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक 3.59 टक्क्यांनी वाढून 3,781.42 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 3,650.29 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
पॉवरग्रिडने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या संचालक मंडळाने 10 रुपयांच्या प्रत्येक इक्विटी शेअरवर 4 रुपये अंतरिम लाभांश मंजूर केला आहे. कंपनीने सांगितले की अंतरिम लाभांश भागधारकांना 6 डिसेंबर 2023 रोजी दिला जाईल. बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने निकाल जाहीर केले आहेत. हा शेअर काल 0.10 टक्क्यांच्या किंचित घसरणीसह 208 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका महिन्यात शेअर्समध्ये 5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर गेल्या वर्षभरात शेअर्समध्ये 43 रुपयांनी म्हणजेच 26 टक्क्यांनी तेजी नोंदवली आहे.
जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक 3.59 टक्क्यांनी वाढून 3,781.42 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 3,650.29 कोटी रुपयांचा नफा झाला होता. तिमाही आधारावर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा 3597.1 कोटी रुपयांपेक्षा 5 टक्के जास्त आहे.
तिमाहीत पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा खर्च पूर्वीपेक्षा कमी होता, त्यामुळे नफा वाढला आहे. मात्र, या काळात कंपनीला जास्त करही भरावा लागला. कंपनीचा कामकाजामधील महसूल 11,267.07 कोटी आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 11,150.57 कोटींपेक्षा 1.04 टक्के जास्त आहे. जून 2023 ला संपलेल्या तिमाहीत ऑपरेशनल महसूल11,048.1 कोटींवरून 2 टक्क्यांनी वाढला आहे.
SL/KA/SL
8 Nov. 2023