बंदुकीचे परवाने घेण्यासाठी इस्त्रायली नागरिकांनी केली गर्दी

 बंदुकीचे परवाने घेण्यासाठी इस्त्रायली नागरिकांनी केली गर्दी

छायाचित्र प्रातिनिधीक

जेरुसलेम, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्रायल-हमास युद्ध सुरु होऊन आता पंधरा दिवसांहून अधिक दिवस झाले आहेत. या भीषण पार्श्वभूमीवर इस्त्रायली नागरिक स्वसंरक्षणार्थ बंदुकीचे परवाने घेण्यासाठी गर्दी करत आहेत. एका इस्राईली वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार 1 लाख 50 हजार लोकांनी बंदूक परवान्यासाठी अर्ज केला आहे. गतवर्षी याच काळात 42 बंदूक परवाना अर्ज प्राप्त झाले होते. परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या एका महिलेने सांगितले- मला 6 मुले आहेत. 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यानंतर मला स्वसंरक्षणाचे महत्त्व समजले आहे. मी शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षणही घेत आहे. मुलांना सुरक्षित ठेवणे हे माझे प्राधान्य आहे.

इस्रायली नागरिकांच्या मनात पॅलेस्टाईनच्या वूल्फ अटॅकची भीती वाढली आहे. इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा मंत्री इटामार बेन गवीर यांनी सरकार लोकांना देण्यासाठी 10,000 रायफल खरेदी करत असल्याची घोषणा केली होती. 4 हजार रायफल, हेल्मेट आणि बुलेटप्रूफ जॅकेटची खरेदी करण्यात आली आहे. हे लवकरच लोकांना दिले जातील.

गाझा पट्टी इस्रायल आणि इजिप्तच्या दरम्यान आहे. हे ठिकाण सध्या हमासच्या ताब्यात आहे. हा इस्रायलविरोधी गट आहे. सप्टेंबर 2005 मध्ये इस्रायलने गाझा पट्टीतून आपले सैन्य मागे घेतले. 2007 मध्ये इस्रायलने या भागावर अनेक निर्बंध लादले होते. वेस्ट बँक आणि गाझा पट्टीमध्ये स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्य स्थापन करावे, असे पॅलेस्टाईनचे म्हणणे आहे.

SL/KA/SL

27 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *