Google Pay वरून घेता येणार कर्ज

 Google Pay वरून घेता येणार कर्ज

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Google Pay हे लोकप्रिय पेमेंट App आता एक खूपच छान सुविधा घेऊन आले आहे. गुगल इंडियाने छोट्या व्यापाऱ्यांना लक्षात घेऊन छोट्या कर्जाची सुविधा सुरू केली आहे. व्यापाऱ्यांना अनेकदा छोटी कर्जे आणि अधिक सोप्या परतफेड पर्यायांची आवश्यकता असते. त्यांच्या याच गरजा पूर्ण करण्यासाठी, डीए फायनान्ससोबत गुगल पेवर 15,000 इतके कमी कर्ज देण्याची सोय उपलब्ध केली आहे आणि ते 111 रुपये इतके कमी हप्त्यांसह पेमेंट करू शकतात यासाठी Google Pay ने डीएमआय फायनान्ससह पार्टनरशिप केली आहे.

सॅशे लोन ही एक प्रकारची नॅनो-क्रेडिट किंवा खूप छोटी कर्जे आहेत, जी तुम्हाला खूप कमी कालावधीसाठी मिळतात. सहसा हे प्री-अप्रूव्ड असतात आणि तुम्हाला हे कर्ज लगेच मिळते.परतफेड करणे देखील सोपे आहे. ही कर्जे 10,000 रुपयांपासून सुरू होतात आणि त्यांचा कालावधी 7 महिने ते 12 महिन्यांपर्यंत असू शकतो. सॅशे लोन मिळवण्यासाठी तुम्हाला एकतर लोन ऍप डाउनलोड करावे लागेल. तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता, आणि व्हेरिफिकेशन प्रोसेसही सोपी आहे.

SL/KA/SL

26 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *