मोखाड्यात ड्रग्सचा मोठा साठा जप्त, फार्महाऊस वर छापा

 मोखाड्यात ड्रग्सचा मोठा साठा जप्त, फार्महाऊस वर छापा

पालघर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात ललित पाटील ड्रग्स प्रकरण तापलेले असतानाच पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा इथं एक ड्रग्स कारखाना आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. मीरा भाईंदर गुन्हे शाखेनं एका प्रकरणात वसई मधून एका आरोपीला अटक केल्यानंतर मोखाड्यात जाऊन या ड्रग्स कारखान्यावर कारवाई केली आहे.

पालघर चे पोलिस अधिक्षक बाळासाहेब पाटिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातल्या नवघर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या एका गुन्ह्यात ६ आरोपींना मीरा भाईंदर पोलिसांनी अटक केली होती. त्या ६ आरोपींपैकी १ आरोपी हा वसई मध्ये राहणारा होता. पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान त्या आरोपीने त्यांचं सर्व काम हे त्याच्या मोखाडया मधल्या एका फार्महाउस वरून चालत असल्याची माहिती समोर आली.

त्यानुसार मीरा भाईंदर पोलिसांनी मोखाड्या मधल्या कावलपाडा या ठिकाणी असलेल्या फार्म हाऊस रविवारी सकाळ च्या दरम्यान छापा टाकला असता तिथे हा ड्रग्स चा गोरखधंदा सुरू असल्याचं सापडून आलं. या कारवाईत मीरा भाईंदर पोलिसांनी कोट्यावधी रुपयांचं साहित्य जप्त केल्याची माहिती सध्या समोर येत आहे. मागील आठवड्यात याच परिसरात ड्रग्स विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे आता अगदी मोखाड्यासारख्या ग्रामीण भागातही पसरले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ML/KA/SL

23 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *