भारतात तयार होतो या देशातील पोलिसांचा गणवेश

 भारतात तयार होतो या देशातील पोलिसांचा गणवेश

थिरुवनंतपुरम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या दोन आठवड्यांपासून इस्राइल आणि हमास यांच्यामध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. हमासला पाठींबा देत आता इराणनेही या युद्धात उघडपणे उडी घेतली आहे. दरम्यान इस्राईल पोलिसांच्या गणवेशांचा भारताशी खास संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. केरळ राज्यातील कन्नूरच्या कुथुपरंबा शहरातील मेरियन गारमेंट कारखान्यात गेल्या ८ वर्षांपासून इस्राइलच्या पोलिसांची वर्दी शिवण्याचे काम सुरु आहे.

सध्या इस्राइलमध्ये निर्माण झालेल्या आपत्कालिन स्थितीमुळे केरळमधील या कारखान्यात वर्दी तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. कारण त्यांना आता आधी मिळालेल्या अवधी आधीच वर्दींची ऑर्डर पूर्ण करायची आहे.

या बाबत बोलताना मेरियन गारमेंटटे व्यवस्थापकीय संचालक थॉमस ओलिकल म्हणाले की, “दरवर्षी आमच्या कारखान्याला इस्राइल पोलिसांच्या ऑलिव्ह ग्रीन स्टेच शर्ट आणि पँट अशा १२ हजार गणवेशांची ऑर्डर पूर्ण करायची असते. यावर्षी कारखान्याला युद्धामुळे अधिकच्या वर्दी लवकरात लवकर तयार करायच्या आहेत. यासाठी १३०० महिला आणि २०० पुरुष कारागिर रात्रंदिवस काम करत आहे. “

या कारखान्यामध्ये फिलिपिन्स, सौदी अरेबिया, कतार आणि कुवेत या देशांचे लष्करी गणवेशही तयार केले जातात.

SL/KA/SL

19 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *