सरस्वती रूपात सजली रुक्मिणीमाता…

 सरस्वती रूपात सजली रुक्मिणीमाता…

सोलापूर दि १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवरात्री निमित्त आज पंढरपूरच्या रुक्मिणीमातेस सरस्वती देवीचा पोशाख करण्यात आला होता. यासाठी रुक्मिणी मातेस मोत्याच्या दागिन्यांचा साज सजविण्यात आला. यामध्ये २१ मोत्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. तर विठ्ठलास देखील पारंपरिक सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले होते. सरस्वती रुपातील रुक्मिणी मातेचे रूप भक्तांना आज आकर्षित करत होते. मोरपीस , मखमली पांढरी शुभ्र प्रभावळ त्यामुळे रुक्मिणी मातेचा पोशाख अधिक खुलून दिसत होता.

ML/KA/SL

18 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *