ड्रगमाफिया ललित पाटीलला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ड्रगमाफिया ललित पाटीलच्या बंगळुरूत मुसक्या आवळल्यावर त्याला मुंबईतील अंधेरी कोर्टात हजर केलं. कोर्टाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई पोलिसांतील कायदा सुव्यवस्था सहआयुक्त सत्यनारायण चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त पश्चिम विभाग परमजीतसिंह दहिया यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. “मुंबई पोलिसांना 10 ग्रॅम ड्रग्ज सापडलं होतं. त्याच्या तपास करता करता नाशिक, पुणे येथे धाडी टाकल्या. या सर्व धाडींमध्ये 150 किलो MD ड्रग सापडलं, ज्याची किंमत 300 कोटी आहे. त्या सर्व प्रकरणामध्ये हे 15 आरोपी आहेत. हे सर्व आरोपी आपण अटक केलेले आहेत”, असं मुंबई पोलिसांनी सांगितलं.
ड्रग्जप्रकरणात पोलिसांनी 14 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर काल ललित पाटीलला अटक केली. त्यामुळे अटकेतील आरोपींची संख्या 15 वर पोहोचली. साकीनाका पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं. कोर्टाने ललित पाटीलला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
साकिनाका पोलीस ठाण्यात एनपीएसचा गुन्हा दाखल होता. ऑगस्टमध्ये 10 ग्राम एमडी सापडलं होतं. यात पुढील तपासांत 150 किलो एमडी जप्त केलंय. ज्याची किंमत अंदाजे 300 कोटी आहे. सापळा रचून ललित पाटीलला कर्नाटकातून अटक केलीय. तो आज जे काही बोललाय त्याबाबत पुणे पोलीस अधित तपास करतील. आमची केस ड्रग्जशी संबंधित आहे, असं पोलीस म्हणाले.
SW/KA/SL
18 Oct. 2023