बेटींग App प्रकरणी अनेक बॉलिवुड सेलिब्रिटी ईडीच्या निशाण्यावर

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आता ईडीच्या रडारवर आहेत. याला कारण ठरले आहे महादेव बेटिंग अॅप’याप्रकरणाचा ईडीकडून कसून तपास सुरू आहे. ईडीने आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी नोटीस पाठवत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत. एकूण ३८ सेलिब्रिटींवर ईडीची सध्या नजर आहे. या सेलिब्रिटींची नावं देखील समोर आले आहेत. या सर्व सेलिब्रिटींच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महादेव बेटिंग अॅप प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि या अॅपचा प्रमोटर सौरभ चंद्राकार याचं याचवर्षी फेब्रुवारीमध्ये दुंबईत लग्न झालं होतं. सौरभच्या लग्नाला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्याचसोबत दुबईमध्ये सौरभच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन आणि सक्सेस पार्टीमध्ये देखील बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले होते. याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते. हे सर्व सेलिब्रिटी सध्या ईडीच्या रडारवर आहेत.
सौरभने आपल्या लग्नासाठी जवळपास २०० कोटींची उधळपट्टी केली होती. तसंच वाढदिवसाची पार्टी आणि सक्सेस पार्टीसाठी त्याने ६० कोटी रुपये खर्च केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. सौरभने बॉलिवूड सेलिब्रिटींना लग्नाला आणि वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी तसंच त्याच्या अॅपचे प्रमोशन करण्यासाठी मोठी रक्कम दिली असल्याचे देखील तपासातून समोर आले आहे. ईडीच्या रडारवर असलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं देखील समोर आले आहेत. या सेलिब्रिटींमध्ये संजय दत्त, सुनील शेट्टी, नौरा फतेही, मौनी रॉय, टायगर श्रॉफ या सेलिब्रिटींसह अनेकांच्या नावाचा समावेश आहे.
SL/KA/SL
11 Oct. 2023