हवाई दलाच्या फायटर विमानांचे प्रदर्शन

पुणे, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना देशाच्या संरक्षण विभागातील हवाई दलाच्या विविध फायटर विमानांची माहिती व्हावी आणि देशाप्रती आदर निर्माण व्हावा याकरता डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने रेडिओ कंट्रोलने उडणाऱ्या विमानांचा एरोमॉडेलिंग शो आयोजित करण्यात आला होता. उडणारा गरुड, उडता मासा, उडती तबकडी, दोन पंखी बायप्लून, बॅनरसह हवाई पुष्पवृष्टी करणारे सेस्ना विमान ही या उपक्रमाची वैशिष्ट्ये होती. भारतीय वायुसेनेतील सध्या सेवेत असलेल्या मिग 21, जॅग्वार, मिराज 2000, मिग 29, सुखोई 30, तेजस तसेच फायटर्सच्या कौशल्यपूर्ण आणि चित्तथरारक कसरती यावेळी विद्यार्थ्यांना पाहता आल्या …Display of Air Force fighter jets…
ML/KA/PGB
7 Oct 2023