भाजप नेते नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर येतोय चित्रपट

 भाजप नेते नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर येतोय चित्रपट

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या वेगवान कार्यपद्धतीसाठी लोकप्रिय आहेत. गडकरींना ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ या नावानेही ओळखले जाते.सोशल मिडीयावरही त्यांचे असंख्य चाहते आहेत. अशा या देशाच्या राजकारणात आपल्या अनोख्या कार्यशैलीमुळे नावलौकीक कमावलेल्या महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याच्या आयुष्यावर आता लवकरच एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘गडकरी’ या नावाने चित्रपट येत आहे. अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित गडकरी या चित्रपटाचे निर्माते हे अक्षय अनंत देशमुख आहेत.

या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे.हा चित्रपट 27 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे टिझर पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक भुसारींनी सांगितले की, ’केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राजकीय कारकीर्द उल्लेखनीय आहे. अभ्यासू राजकारणी, प्रभावी वक्ते, कणखर विचारांचा नेता, देशभरात झालेले रस्त्यांचे जाळे या त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे त्यांचे जवळपास सर्व पैलू जनतेला माहिती आहेत. समाजकल्याणाचा ध्यास घेतलेल्या या लोकप्रिय नेत्याचा राजकीय प्रवास लोकांना माहिती असला तरी त्यांचे खासगी आयुष्य व तारुण्यही तितकेच रंजक. म्हणूनच त्यांचा आतापर्यंतचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.’

SL/KA/SL

7 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *