दादर येथील महात्मा गांधी स्विमिंग पूल मध्ये सापडले मगरीचे पिल्लू

 दादर येथील महात्मा गांधी स्विमिंग पूल मध्ये सापडले मगरीचे पिल्लू

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आज पहाटे सकाळी साडे पाचच्या सुमारास दादर येथील महात्मा गांधी तरण तलाव परिसरातील ऑलिंपिक आकारच्या जलतरण तलावात मगरीचे पिल्लू आढळून आले. हे पिल्लू तज्ज्ञांच्या मदतीने पकडण्यात आले‌ असून ते वनखात्याच्या ताब्यात देण्यात आहे. तसेच हे मगरीचे पिल्लू तरण तलावात कुठून आले, याची चौकशी करण्यात येणार असून त्यानुसार आवश्यक ती प्रतिबंधात्मक ती काळजी भविष्यात घेण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त (उद्याने). किशोर गांधी यांनी दिली आहे. Baby crocodile found in Mahatma Gandhi swimming pool in Dadar

जलतरण तलाव व नाट्यगृहांचे समन्वयक . संदीप वैशंपायन यांनी सांगितले की, रोज पहाटे तरण तलाव सदस्यांसाठी सुरू करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांद्वारे तरण तलावाचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात येते. यानुसार आज पहाटे साडे पाच च्या सुमारास तरण तलावाचे निरीक्षण करीत असताना ऑलम्पिक आकाराच्या व शर्यतीसाठीच्या तरण-तलावात मगरीचे पिल्लू आढळून आले. त्यानंतर तज्ञांच्या मदतीने तात्काळ कार्यवाही करीत हे पिल्लू सुरक्षितपणे पकडण्यात आले . हे पिल्लू वनखात्याच्या ताब्यात देण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही सुरु करण्यात आली .

ML/KA/PGB
3 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *