भारतीय रेल्वेने केला सफाईचा ‘१४ मिनिटांचा चमत्कार’
नागपूर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रेल्वेने काल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली इतर मान्यवरांच्या उपस्थितीत व्हिडिओ लिंकद्वारे स्वच्छता पंधरवड्याचा एक भाग म्हणून सर्वात उल्लेखनीय उपक्रम राबविला. ही कामगिरी भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच पार पाडण्याचा प्रकार होता.
देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या असलेल्या वंदे भारत गाड्या एकाच वेळी १४ मिनिटांच्या विक्रमी वेळेत स्वच्छ करण्यात आल्या. मध्य रेल्वेने वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या रेकच्या दर्जेदार साफसफाईसाठी ही “अन्य टोकाच्या टर्मिनल स्थानकांवरील” नवीन “१४ मिनिटांचा चमत्कार” योजना स्वीकारली आहे. ही नवीन योजना कालपासून लागू करण्यात आली आहे.
हा सराव सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस करीता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – साईनगर शिर्डी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस करीता साईनगर शिर्डी येथे आणि बिलासपूर – नागपूर – बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस करीता नागपूर येथे घेण्यात आला.
नागपूर येथे देखील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर ट्रेन आल्यानंतर आणि सर्व प्रवासी उतरल्याची खात्री केल्यानंतर १२.४२ वाजता साफसफाईची कारवाई सुरू झाली. ते १२.५६ वाजता विक्रमी १४ मिनिटांत पूर्ण झाले.
४४ सफाई कर्मचार्यांनी ३ टीम-टीम A, B आणि C मध्ये केलेली साफसफाईची प्रक्रिया प्लॅटफॉर्मवर ट्रेन आल्यानंतर आणि प्रवासी वेळेत उतरले आहेत याची खात्री करून सुरू झाली.
मध्य रेल्वेचे नागपूर
विभागीय रेल्वे व्यवस्थापक, तुषारकांत पांडेय, यांनी देखील या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला आणि 14 मिनिटात अन्य साफसफाई कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने वंदे भारत एक्सप्रेस स्वच्छ करण्यात आली.
यावेळेला स्वच्छतागृहे, रॅक, पटल, आसन, फ्लोरींग आणि कोचच्या बाहेरील भागांसह आतील भागांची सखोल साफसफाई करण्यासाठी टीमची स्थापना करण्यात आली होती. शौचालयात पॅन सीट, काच इत्यादी साफ करण्यासाठी आणि कचरा गोळा करण्यासाठी ८ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली टीम ए नियुक्त केली आहे.
३२ कर्मचार्यांचा समावेश असलेली टीम बी डब्यातील जागा, स्नॅक टेबल, साइड पॅनेल्स साफ करणे आणि कोच फ्लोअर साफ करणे यासाठी नियुक्त केलेली आहे. सर्व डब्यांच्या खिडक्यांच्या साफसफाईसाठी ४ कर्मचार्यांचा समावेश असलेली टीम सी नियुक्त केली आहे. हे सर्व १४ मिनिटांच्या विक्रमी वेळेत पुढीलप्रमाणे केले जाईल – २ मिनिटे बॅगमध्ये कचरा गोळा करण्यासाठी, ३ मिनिटे सीट आणि स्नॅक टेबल साफ करण्यासाठी, ३ मिनिटे पॅनेल आणि कोच साफ करण्यासाठी आणि ६ मिनिटे कोच फ्लोअरिंगच्या साफसफाईसाठी हे काम आव्हानात्मक असले तरी, भारतीय रेल्वेने ही उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी नाविन्यपूर्ण दृष्टीकोन, तंत्र आणि उपकरणे स्वीकारली आहेत.
ML/KA/SL
2 Oct. 2023