‘गणपत’ चित्रपटाचा टिझर रिलिज

 ‘गणपत’ चित्रपटाचा टिझर रिलिज

मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या बहुचर्चीत ‘गणपत’ चित्रपटाचा टीझर अखेर रिलीज झाला आहे. या चित्रपटातील टायगरच्या लूकची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. टायगरसोबत बिग बी अमिताब आणि क्रिती सेनन यांच्या अॅक्शन रोलची चाहत्यांना जेवढी उत्सुकता होती, त्याही पेक्षा जास्त उत्सुकता आता हे ट्रेलर पाहिल्यानंतर वाढणार आहे. जबरदस्त अॅक्शनचा भंडार असलेल्या या चित्रपटात क्रिती देखील पहिल्यांदाच अॅक्शन रोल करताना दिसणार आहे. शिवाय सुपरस्टार अमिताभ बच्चन देखील वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
पुढील महिन्यात हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे. त्याआधी आज या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये टायगर एका योद्ध्याच्या भूमिकेत दमदार स्टाईल करताना दिसत आहे. टीझरमध्ये टायगरने आपल्या अ‍ॅक्शनने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. टायगरसोबत क्रिती सेननही अॅक्शन करताना तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर अमिताभ बच्चन यांची झलकही या टीझरमध्ये आहे. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे बिग बींच्या दमदार आवाजाने हा टीझर अधिक शक्तिशाली बनवला आहे.

टीझरच्या सुरुवातीलाच अमिताभ बच्चन ‘आमचा योद्धा येईपर्यंत ही लढाई लढू नका’ असे आव्हान देतो. त्यानंतर टायगर श्रॉफ त्याच्या धासू अॅक्शनमध्ये दिसत आहे. त्याच्यासोबत क्रिती सेनन देखील अॅक्शन करताना दिसत आहे. टीझरमध्ये अॅक्शनसोबतच रोमान्सचा टचही देण्यात आला आहे. पूजा एंटरटेनमेंटच्या यूट्यूब चॅनलवर चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.

SL/KA/SL

29 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *