जश्ने ईद मिलादुन्नबी उत्सवनिमित्त काढण्यात आला जुलूस..
बुलडाणा, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या वाढदिवसानिमित्त जश्ने ईद मिलादुन्नबी उत्सव मुस्लिम समुदायाकडून उत्साहात साजरा करण्यात आला. बुलडाणा शहरातून जश्ने ईद मिलादुन्नबी उत्सवा निमित्त मोठ्या आनंदात आणि जल्लोषात जुलूस काढण्यात आला.
इंदिरा नगर येथून जुलूसची सुरुवात होवून संगम चौक,जयस्तंभ चौक,आठवडी बाजार,जनता चौक होत हा जुलूस इकबाल चौक,टिपू सुलतान चौकात पोहचला,त्यानंतर जुलुसचा समारोप इकबाल चौकात करण्यात आला, जुलूस मध्ये डी. जे.मधील कव्वाली च्या गजरात, समाजाचे झेंडे फिरवत जुलूस मध्ये लहान,मोठे,युवक आणि वयोवृद्धांनी सहभाग नोंदविला. A procession was taken out on the occasion of Eid Miladunnabi festival.
ML/KA/PGB
29 Sep 2023