पाच कैद्यांनी तयार केल्या पर्यावरण पूरक शाडू मातीच्या मनमोहक गणेश मूर्ती

 पाच कैद्यांनी तयार केल्या पर्यावरण पूरक शाडू मातीच्या मनमोहक गणेश मूर्ती

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  येथील खुले जिल्हा कारागृहातील चार जन्मठेपची शिक्षा भोगणारे कैदी आणि एक न्यायाधीन बंदी अशा पाच जणांनी आपल्या कलाकुशलाने तयार केलेल्या पर्यावरण पूरकर शाडू मातीच्या सुंदर, सुबक आणि मनमोहक १०१ गणेश मूर्तींच्या विक्रीच्या स्टॉलचा शुभारंभ शनिवारी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी असा अभिनव उपक्रम राबविण्याच्या जिल्हा कारागृह अधीक्षक खुले जिल्हा कारागृहात बंद्यांचे सुधारणा व पुनर्वसन होण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून जल्मठेप झालेले 4 कैदी व 1 न्यायाधीन बंदी यांनी पर्यावरण पूरक शाडू मातीचे सुंदर , सुबक व मनमोहक अशा १०१ गणपतीच्या मूर्ती तयार केल्या आहेत.

जिल्हा कारागृहात पहिल्या वेळेस अतिशय चांगला उपक्रम राबविला आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते या मूर्ती विक्रीच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. मूर्ती तयार करणारे कैदी फुलाराम नवरामजी मेघवाड हे नाशिक कारागृहातून धुळे खुल्या कारागृहात आले. ते जन्मठेपची शिक्षा भोगत आहे. त्यांनी स्वत: तर मूर्ती तयार केल्या पण सोबतच गोपाल माधव गायकवाड, विलास लक्ष्मण कोळी, सोपान रघुनाथ काशीद व हरीश धीरुभाई पटेल या कैदी व न्यायाधीन बंदीलाही मूर्ती तयार करणे शिकविले.

ML/KA/PGB
17 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *