मुंबईतील राजभवन आता भाड्याने…

 मुंबईतील राजभवन आता भाड्याने…

मुंबई, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तुम्हाला राजभवनात काही कार्यक्रम करायचे आहेत का तर मग महाराष्ट्राचे मुंबईतील राजभवन आता भाड्याने मिळायला सुरुवात झाली आहे .

राज्याला नवीन राज्यपाल मिळाले आणि मग हा नवा बदल झाला असून हा नवा पायंडा पाडण्यात आल्याचे समजले आहे. माजी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी आपल्या कार्यकाळात राजभवनात कार्यक्रम घ्यायचा सपाटा लावला होता. मात्र त्यांची बदली झाली आणि इथल्या कार्यक्रमांच्या संख्येत झपाट्याने घट झाली आहे. आता सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनात कार्यक्रम घ्यायचा असेल तर शुल्क निश्चित केले आहे.

त्यानुसार राजभवन येथील दरबार हॉलसाठी 1लाख रुपये आणि इतर हॉल साठी 50,000 हे शुल्क निश्चित केले आहे तर चहापाणी आणि नाश्त्याचा खर्च वेगळा आकारण्यात येत आहे. या शुल्काची रीतसर पावती दिली जात असली तरी आज पर्यन्त च्या राजभवन च्या इतिहासात अशा प्रकारे शुल्क आकरण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मागील काळात राजभवनातील कार्यक्रम हे सरकारच्या पैशानी होत होते, कोशियारी यांच्या काळात त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने तत्कालीन माविआ सरकारने राजभवनच्या निधीत कपात केली होती. कोरोना काळात इतर कुठेही कार्यक्रम होत नव्हते मात्र राजभवनातील कार्यक्रम सुरळीत सुरू होते . इथले कार्यक्रम प्रतिष्ठेचे आणि स्वस्तात पार पडत असल्याने आणि मुळातच राज्यपाल फारच हौशी असल्याने त्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली होती.

अशा कार्यक्रमात मुख्य पाहुणे राज्यपाल असल्याने त्याला खूप प्रतिष्ठा मिळत होती, मात्र कोषियारी यांच्यानंतर आलेल्या राज्यपाल रमेश बैस यांनी अशा प्रकारे शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे राजभवनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

ML/KA/SL

13 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *