मेडीकल कॉलेज प्रवेशाच्या नावाखाली मध्यस्थांचे अपहरण करून खंडणीखोरी

 मेडीकल कॉलेज प्रवेशाच्या नावाखाली मध्यस्थांचे अपहरण करून खंडणीखोरी

ठाणे, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नेरुळच्या नामांकित मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली मध्यस्थांचे अपहरण करून त्यांच्याकडुन खंडणी उकळणाऱ्या कॉंग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचा ठाणे शहर अध्यक्ष प्रथमेश यादवसह पाच जणांवर कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाचजणांच्या टोळक्याने धमकावत तब्बल ५० हजार उकळल्याची तक्रार मनोरमा नगर येथील किराणा दुकानदार जयेश पटेल यांनी केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मनोरमा नगर येथे राहणारे किराणा दुकानदार जयेश पटेल यांचे वडील प्रेमजीभाई पटेल हे सामाजिक कार्य करतात.२३ ऑगस्ट रोजी प्रेमजीभाईचा मित्र चंद्रकांत कांबळे हे त्यांचा सोबती राजकुमार वानखेडे याच्यासह दुकानात आले. त्यांनी त्यांच्या परिचिताच्या मुलीला नेरुळ (नवीमुंबई) येथील मेडीकल कॉलेजमध्ये एमडी (स्किन) साठी अॅडमिशन करून देण्याचे काम सांगितले.त्यानुसार,प्रेमजीभाई यांनी विद्यार्थी काँग्रेसचा ठाणे शहर अध्यक्ष प्रथमेश यादव याला संपर्क साधला. प्रथमेशने अजित ओझा याला संपर्क करण्यास सांगितले.ओझा याने मेडीकल प्रवेशासाठी डोनेशन म्हणुन ६७ लाख ५० हजार आणि स्वतःचे कमिशन १० लाख द्यावे लागतील, असे सांगितले. प्रेमजीभाई यांनी वानखेडे व कांबळे यांना ही बाब कळवल्यानंतर त्यांनी सहमती दर्शवताच ओझा याने २५ ऑगस्ट २०२३ रोजी कागदपत्रे घेऊन नेरूळ येथे येण्यास सांगितले. त्यासाठी, कॉलेजच्या प्रोफेसरचा वाराणसी येथुन आलेल्या भाऊ पवनकुमार मिश्रा याच्याशी गाठ घालुन देण्याकामी कळंबोली येथे भेटण्याचे ठरले. परंतु, पैशांची जुळवाजुळव होऊ न शकल्याने नंतरची वेळ देण्याची विनंती केली. मात्र, ओझाने आम्हीच उपवनला येतो, तिथे भेटण्यास बोलावले. तेथे भेटण्यास प्रेमजीभाई राजी होत नसल्याने मानपाडा, आर मॉल येथे भेटण्याचे ठरले. जयेश याने वडील प्रेमजीभाई यांना दुचाकीवर बसवुन आर मॉलजवळ नेले.तेथे अजित ओझा, पवनुमार मिश्रा, विनीत तिवारी, प्रथमेश यादव आणि विष्णु घाडगे या खंडणीखोर टोळक्याने नाहक मारहाण करीत प्रेमजीभाई आणि कांबळे यांना आपल्या गाडीत कोंबले. तसेच, अपहरण करून ठाण्यातील सिनेवंडर मॉलच्या पार्किंगमध्ये गाडी नेऊन प्रेमजीभाई आणि कांबळे यांना गाडीतच डांबुन ठेवत दमबाजी केली. याठिकाणी वडीलांच शोध घेत जयेश पोहचला असता, भेट रद्द झाल्यापोटी नुकसान भरपाई म्हणुन ५० हजार दिले तरच वडिलाना सोडणार असल्याचे धमकावले. त्यामुळे जयेश यांच्याकडुन पेटीएम द्वारे ४९ हजार ९८० रक्कम स्विकारून वडिलांची सुटका केली.तसेच पोलिसांना कळवल्यास वाईट परिणाम होतील, असा दम भरला. अशाचप्रकारे कांबळे याच्या सुटकेसाठीही ५० हजार खंडणी उकळल्याचे जयेश यांनी तक्रारीत नमुद केले आहे. Kidnapping middlemen and extortion in the name of medical college admission

ML/KA/PGB
12 Sep 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *