मुंबई गोवा महामार्ग दूरवस्थेची कथा, एस टीमध्ये झाला बाळाचा जन्म

 मुंबई गोवा महामार्ग दूरवस्थेची कथा, एस टीमध्ये झाला बाळाचा जन्म

रायगड, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील मुंबई गोवा रस्त्याची अवस्था काही वेगळी सांगायला नको यांच रस्त्यामुळे एका गर्भवती महिलेची पनवेल ते महाड एस टी ने प्रवास करीत असताना कोलाड येथे आल्यावर भर एस टी बस मध्ये प्रसूती करण्याची वेळ आली.

मुंबई गोवा महामार्ग हा जवळपास १४ वर्ष उलटले तरी सुद्धा अद्याप पूर्ण झाला नाही. या भयानक रस्त्यामुळे तसेच त्यावरील खड्यामुळे एस टी होडी सारखी हलत असते. पनवेल बाजूकडून पनवेल महाड एस टी ने माणगांव येथील रुद्रवली या गावाकडे निघालेल्या सुशीला रवी पवार वय ३२,यांनी काल कोलाड येथे धावत्या बसमध्येंच आपल्या नवजात बाळाला जन्म दिला.

यामुळे एस टी चालक गोविंद जाधव आणि वाहक नामदेव पवार यांनी कोलाड शहरात आल्यावर, त्या महिलेला कोलाड येथील प्राथमिक रुग्णालय आंबेवाडी येथे दाखल केले.
त्या ठिकाणी डॉक्टर वि. बी. तिवडे यांनी नवजात बाळाला तपसाले असता नवजात बाळाची आणि त्याच्या आईची प्रसूती प्रमाणे त्या महिलेला सात महिने झाले होते. नवजात बाळाचे वजन १.८ किलो इतके असल्याचे सांगितले.

पुढील उपाचारासाठी नवजात बाळाला आणि त्याच्या आईला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे.
त्या बाळाची तसेच आईची तब्येत व्यवस्थित आहे.

मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांची अद्याप पूर्णपणे कोणतीही दुरुस्ती न झाल्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खूपच त्रास सहन करून प्रवास करावा लागत आहे. या असंख्य मृत्यू झाले असून जखमींचा आकडाही मोठा आहे. त्यातच अशा नव्या प्रकारांची भर त्यात पडू लागली आहे.

ML/KA/SL

11 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *